Saturday, June 29, 2024
Homeताज्या घडामोडीHSC Exam Result : बारावी फेल झालात? लोड घेऊ नका! 'हे' आहेत...

HSC Exam Result : बारावी फेल झालात? लोड घेऊ नका! ‘हे’ आहेत तुमच्या यशाचे पर्याय

मुंबई : महाराष्ट्र बोर्डाच्या (Maharashtra Board) बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावर्षी बारावीचा राज्याचा निकाल (HSC Result) ९३.३० टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. राज्यात ९ विभागीय मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी पास झाले. मात्र इतर अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे म्हटले जाते. अपयश हे प्रत्येकाला कुठेतरी आले आहे. कोणाला नापास होऊन तर कोणाला कमी गुणांनी. पण नापास झालात तर हताश होऊ नका. बारावी नापास झाल्यावर अनेक कोर्स उपलब्ध आहेत जे तुम्हाला यशस्वी करु शकतात. तसेच या कोर्समध्ये प्रवेश घेऊन तुमचे चांगले करियरही घडू शकते.

‘हे’ कोर्स करा-

  • आयटीआय डिप्लोमा कोर्सेस – तुम्ही जर १२ वी मध्ये नापास झाला असला तर तांत्रिक क्षेत्रात करियर बनवता येईल. त्यासाठी आयटीआय डिप्लोमा कोर्स करणे तुम्हीच्यासाठी उत्तम पर्याय आहे. भारत सरकारने प्रत्येक शहरात आणि गावात आयटीआय केंद्रे उघडली आहेत. तुम्ही ६ वर्षांचा किंवा २ वर्षांचा डिप्लोमा कोर्स करू शकता. त्यात तुम्हाला सरकारी क्षेत्रात बर्‍याच रोजगाराच्या संधी मिळू शकतात.
  • कॉम्पुटर डिप्लोमा कोर्सेस – डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा नसेल तर आपण कॉम्पुटर डिप्लोमा कोर्स करू शकता. ज्यामध्ये तुम्ही कॉम्पुटर, हार्डवेअर, नेटवर्किंग, मोबाईल, एचटीएमएल, व्हिडीओ एडिटिंग, ड्रीमव्ह्यूव्हर आणि कॉम्प्यूटर या अँप्लिकेशन विषयांचा अभ्यास शिकू शकता.
  • अ‍ॅनिमेशन मधील डिप्लोमा कोर्सेस – अ‍ॅनिमेशनच्या सतत वाढत्या वापरामुळे या क्षेत्रातील व्यावसायिकांना मोठी मागणी आहे. अ‍ॅनिमेशन कोर्स करिअरची हमी म्हणून पाहिला जात आहे. चित्रपट, खेळ आणि जाहिराती यासारख्या क्षेत्रात अ‍ॅनिमेशनचा बराच वापर केला जातो. अ‍ॅनिमेशनच्या अनेक डिप्लोमा कोर्समध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण प्रवेश घेऊ शकता.
  • डिझाइन मधील डिप्लोमा कोर्सेस – दहावी उत्तीर्ण झाल्यावरच तुम्ही डिझाईनच्या कोणत्याही पदवीच्या कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. जर तुम्हाला डिझाईन क्षेत्रात रस असेल तर! डिझाईनमध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, फॅशन डिझायनिंग, इंटिरियर डिझायनिंग इत्यादी क्षेत्रात डिप्लोमा कोर्स करू शकता.
  • इंजीनियरिंग डिप्लोमा कोर्सेस – दहावी उत्तीर्ण मार्कशीटच्या आधारे आपण इंजीनियरिंगच्या डिप्लोमा कोर्स करू शकतो. दहावी पासून इंजीनियरिंगच्या तीन वर्षाच्या डिप्लोमा कोर्समध्ये प्रवेश घेऊ शकता. या डिप्लोमा कोर्समुळे तुम्हाला खासगी कंपनी मध्ये चांगली नोकरी मिळू शकते. मॅकेनिकल इंजीनियरिंग , इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, सिव्हिल इंजीनियरिंग, संगणक इंजीनियरिंग, माहिती तंत्रज्ञान इंजीनियरिंग, केमिकल इंजीनियरिंग इत्यादी इंजीनियरिंगच्या क्षेत्रात प्रवेश करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -