Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडीCovid New Variant : पुन्हा मास्क! कोरोनाच्या आणखी एका विषाणूमुळे जगाची चिंता...

Covid New Variant : पुन्हा मास्क! कोरोनाच्या आणखी एका विषाणूमुळे जगाची चिंता वाढली

मुंबई : कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला. अलिकडच्या काळात या आजाराची प्रकरणे कमी झाली असली तरीही त्याचे अनेक प्रकार सतत चिंतेचा विषय बनत आहेत. काही काळापूर्वी कोरोनाचा JN.1 च्या नवीन प्रकाराचा संसर्ग वाढत असताना कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाच्या आणखी एका प्रकारामुळे जगाची चिंता वाढली आहे.

‘हा’ कोरोनाचा नवा विषाणू

यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) च्या अलीकडील अहवालानुसार, कोरोनाच्या नवीन प्रकारांचा एक नवीन संच सांडपाण्यात अलीकडेच दिसला आहे, ज्याला FLiRT असे नाव देण्यात आले आहे. FLiRT या कोविडच्या नव्या प्रकाराने अमेरिकेत आणि सिंगापूरमध्ये कहर केला आहे. तसेच आता भारतातही पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर गेल्या काही महिन्यांपासून जगभरात कोरोनाची प्रकरणे स्थिर होती, मात्र आता पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे.

नवीन प्रकार FLiRT बाबत सूचना

CDC ने दिलेल्या माहितीनुसार, FLiRT प्रकाराचे दोन प्रकार (KP.1.1 आणि KP.2) सध्या वेगाने वाढत आहेत. दोन आठवड्यांच्या कालावधीत या प्रकारामुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे. अमेरिकेतील येल स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या डीन मेगन एल. रेनी यांनी एका अहवालात सांगितले की, FLiRTमध्ये काही चिंताजनक वैशिष्ट्ये आढळून आली आहेत. त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये असे बदल आहेत ज्यामुळे ते सहजपणे मानवी शरीरात प्रवेश करू शकते आणि संसर्ग होऊ शकतो.

मास्क घालण्याचे आवाहन

सिंगापूरचे आरोग्यमंत्री कुंग यांनी सांगितले की, कोरोनाच्या या नवीन लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहोत, संसर्गाची प्रकरणे सतत वाढत आहेत. येत्या दोन ते चार आठवड्यांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता, सर्व लोकांनी पुन्हा एकदा मास्क घालण्याची सवय लावली पाहिजे जेणेकरून संसर्गाचा प्रसार नियंत्रित करता येईल. प्रत्येकाने जून अखेरपर्यंत संसर्गाच्या या नवीन लाटेबाबत विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.

भारतातही आढळला कोरोनाचा प्रकार

कोरोनाचा नवीन प्रकार, FLiRT भारतातही आढळून आला आहे. भारतात आतापर्यंत २५० प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

Omicron sub-variant KP.2 ची महराष्ट्रात ९१ प्रकरणे आढळून आली आहेत, जे राज्यातील कोरोना प्रकरणांमध्ये वाढ दर्शवितात. १५ मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार, या नवीन प्रकाराची लागण झालेल्यांमध्ये पुण्यात सर्वाधिक ५१ लोक आढळले असून, २० प्रकरणांसह ठाणे दुसऱ्या स्थानावर आहे. अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येकी सात प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दरम्यान, कोरोनाचे हे रूप ओमिक्रॉनसारखे आहे, जे लोकांना वेगाने संक्रमित करू शकते. याशिवाय, हा प्रकार लसीकरणामुळे निर्माण होणारी शरीराची प्रतिकारशक्ती कमी करण्यातही यशस्वी होत असल्याचे दिसत आहे, असे संशोधकांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -