मुंबई: बिझनेसमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री वेडिंग फंक्शन १ ते ३ मार्चदरम्यान जामनगरमध्ये झाले. या ग्रँड इव्हेंटमध्ये बॉलिवूडच्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. यावेळी अनेक परदेशी पाहुणेही सामील झाले होते. आता लग्नाआधी अनंत-राधिका यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन होणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाचे फंक्शन मुंबईत ६ जुलै ते १२ जुलैदरम्यान होणार आहे. मात्र त्याआधी अनंत आणि राधिका यांचे दुसरे प्री वेडिंग फंक्शन होणार आहे जे २९ मेपासून सुरू होईल आणि १ जूनपर्यंत चालेल. दुसरे प्री वेडिंग फंक्शन इटलीमध्ये सुरू होईल आणि १ जूनला स्वित्झर्लंडला संपेल.
३०० व्हीआयपी पाहुणे, नो फोन पॉलिसी
मीडिया रिपोर्टनुसार राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांचे दुसरे प्री वेडिंग खूप खास असणार आहे. यासाठी हे फंक्शन क्रूझवर असणार आहे. यात ३०० पाहुणे सामील होणार आहेत. तीन दिवसांचा हा इव्हेंट खूप प्रायव्हेट ठेवण्यात आला आहे. यावेळी पाहुण्यांसाठी नो फोन पॉलिसी असणार आहे.
व्हायरल झाला राधिकाचा स्पेस थीम आऊटफिट
राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री वेडिंगआधी तिचे आऊटफिट व्हायरल होत आहे. हा स्पेस थीमवाला आऊटफिट राधिकाच्या वेडिंग फंक्शनसाठी डिझाईन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.