मुंबईतील मतदान प्रक्रियेच्या ढिसाळ कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर मतदार याद्यांमध्ये मतदारांची नावे नसल्याचे प्रकार घडल्याचे समोर आले आहे.बहुतेक ठिकाणी मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीने राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. अनेक मतदारसंघात मोठा घोळ झाल्याचे दिसून आल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेवून संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा दिला असतानाच या गोंधळाची राज्याचे मुख्य सचिव यांनी उच्चस्तरीय चौकशी करावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.


सोमवारी मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी गोंधळाच्या परिस्थिती मतदान पार पडले. मुंबईतील बहुतेक ठिकाणी सकाळी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्रामध्ये मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतेक ठिकाणी मोठा घोळ झाल्याचे चित्र होते. मतदार याद्यांमध्ये नाव नसल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला तर, मतदान प्रक्रिया अतिशय संथ गतीन राबवण्यात येत असल्याने मतदान केंद्राबाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या. या प्रकारामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संताप व्यक्त करत न्यायालयात जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला होता. सोमवारी मतदानाच्या दिवशी झालेल्या या ढिसाळ कारभाराची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. मतदान केंद्रांवर ज्या ठिकाणी गैरसोय होती, मतदानाला विलंब लागत होता,या सर्व बाबींची होणार चौकशी करण्यात येणार आहे. मुख्य सचिवांनी तातडीने याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, असेही आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित