Monday, July 15, 2024
Homeताज्या घडामोडीमुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुलांना शाळेत पाठवण्याचे योग्य वय काय? घ्या जाणून

मुंबई: प्रत्येक आई-वडिलांना वाटत असले की विकास योग्य पद्धतीने व्हावा. मात्र हे समजून घेणे गरजेचे आहे की मुलांना प्ले स्कूलला कधी पाठवावे. योग्य वयात प्ले स्कूलला पाठवल्याने मुलांना अधिक फायदे होतात.

जसजशी मुले मोठी होतात तसे पालक आपल्या मुलांना प्री स्कूलमध्ये पाठवण्याचा विचार करतात. प्रत्येक आई-वडिलांना वाटते की त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे तसेच शाळेत जाण्याला त्रास होऊ नये.

मुले जेव्हा व्यवस्थित चालायला तसेच बोलायला आणि एकमेकांमध्ये मिसळायला लागतील तेव्हा प्ले स्कूलला पाठवले पाहिजे. अधिकतर मुलांच्या मेंदूचा ९० टक्के विकास वयाच्या ५ वर्षांपर्यंत होत असतो. या कालावधीत ते लवकर शिकतात आणि नवनवे अनुभव तयार करतात. तुम्ही त्यांना वयाच्या तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षात पाठवू शकता.

प्ले स्कूलमध्ये मुले एकमेकांशी मिसळून वागायला शिकतात. तसेच त्यांचा सामाजिक विकास चांगला होतो. प्ले स्कूलमध्ये मुले आपल्या भावना समजतात तसेच व्यक्त करणे शिकतात. हे त्यांच्या भावनात्मक विकासासाठी गरजेचे असते. तसेच शाळेत खेळ आणि इतर अॅक्टिव्हिटीजही असतात ज्यामुळे त्यांचा शारिरीक विकासही होतो. प्ले स्कूलमध्ये मुले नवनव्या गोष्टी शिकतात. यामुळे त्यांचा मानसिक विकासही व्यवस्थित होतो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -