मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha 2024 elections) आज राज्यात पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान सुरु आहे. मात्र, मतदान (Voting) संथ गतीने सुरु असल्याची चिन्हे आहेत. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सुविधा उपलब्ध नसल्याने, तसेच ईव्हीएम मशीनमधील बिघाडामुळे मतदारांचा खोळंबा झाला आहे. या समस्यांचा सामना करत अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेच इतरांना मतदान करण्याचं आवाहनही केलं आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी मतदान न करणाऱ्यांबाबत परखड मत मांडलं आहे.
परेश रावल यांनी स्वतः मतदान केल्यानंतर इतर मतदारांना घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, “जे लोक मतदान करत नाहीत आणि नंतर तक्रार करतात की सरकार हे करत नाही, ते करत नाही. तेव्हा सरकार नाही तर ते लोक जबाबदार असतात, कारण त्यांनी मतदान केलं नाही. मतदान न करणाऱ्यांसाठी काही तरतुदी असायला हव्यात, जसे की कर वाढवणे किंवा काही अन्य शिक्षा”, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…