Monday, May 12, 2025

क्रीडाताज्या घडामोडीIPL 2025

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता झाली आहे. पावसामुळे आयपीएलचा ७०वा सामना एकही बॉल न खेळता रद्द करण्यात आला. आयपीएल प्लेऑफची लाईनअप तयार झाली आहे.


आता प्लेऑफचे राऊंड सुरू होतील. याची सुरूवात केकेआर विरुद्ध हैदराबाद सनरायजर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हा क्वालिफायर १ सामना असेल जो अहदाबादमध्ये २१ मेला खेळवला जाईल. राजस्थान विरुद्ध बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटरचा सामनाही याच ठिकाणी रंगेल.


सुरूवातीच्या काळात बरेच दिवस पॉईंट्स टेबलमध्ये आपला दबदबा बनवून ठेवणाऱ्या राजस्थानला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. गुवाहाटीमध्ये राजस्थान रॉयल्सला विजय मिळवायचा होता. मात्र पावसाने त्यांच्या आशांवर पाणी फिरवले.


कोलकाता नाईट रायडर्सने १४ सामन्यात २० गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान मिळवले. तर सनरायजर्स हैदराबाद १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिले. राजस्थान रॉयल्सचेही १७ गुण आहे. मात्र नेट रनरेटमुळे त्यांना तिसरे स्थान मिळाले. आरसीबीने नाटकीय अंदाजात पुनरागमन करताना चौथे स्थान मिळवले. आरसीबीने सीएसकेला नेटरनरेटच्या आधारावर मागे सोडत चौथे स्थान मिळवले.



असे आहे वेळापत्रक


केकेआर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर १ सामना खेळवला जाईल. हा सामना २१ मेला अहमदाबादमध्ये रंगेल तर २२ मेला एलिमिनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. क्वालिफायर २ सामना २१ मेला खेळवला जाईल. हा सामना क्वालिफायर १मधील हरणाऱ्या आणि एलिमिनेटरमधील विजेत्या संघात होणार आहे. चेन्नईमध्ये हा सामना रंगेल. फायनल सामना २६ मेला क्वालिफायर १ मधील विजेता आणि क्वालिफायर २मधील विजेता संघ यांच्यात होईल. फायनल सामना चेन्नईमध्येच खेळवला जाईल.

Comments
Add Comment