Sunday, July 7, 2024
Homeक्रीडाIPL 2024IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये...

IPL 2024: चेन्नई बाहेर जाण्याचे दु:ख पचवू शकला नाही अंबाती, कमेंट्री बॉक्समध्ये आले रडू

मुंबई: अंबाती रायडू(ambati raydu) इंडियन प्रीमियर लीगमध्ये(indian premier league) मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळला आहे. अनेकद मुलाखती आणि कमेंट्री दरम्यान समजते की रायडूचे चेन्नईसोबत स्पेशल नाते आहे. गेल्या शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगला. यातील एकाच विजेत्याला प्लेऑफमध्ये जागा मिळणार होती.

चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात बंगळुरूने २७ धावांनी सीएसकेला हरवत टॉप४मध्ये जागा पक्की केली. यातच रायडू हिंदी कमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित होता. जसेही यश दयालने शेवटचा बॉल फेकला तसा रायडू रडायला लागला होता आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

रडायला लागला अंबाती रायडू

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पहिल्यांदा खेळताना २१८ धावा केल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्सला प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी कमीत कमी २०१ धावा हव्या होत्या. प्लेऑफ समीकरणानुसार सीएसकेला शेवटच्या ओव्हरमध्ये कमीत कमी १७ धावा करायच्या होत्या. क्रीझवर एमएस धोनी आणि रवींद्र जडेजा होता. यश दयालच्या पहिल्या बॉलवर धोनीने गगनचुंबी षटकार ठोकला होता. मात्र पुढील बॉलवर तो लगेचच क्लीन बोल्ड झाला.

शेवटच्या २ बॉलमध्ये सीएसकेला १० धावा करायच्या होत्या आणि स्ट्राईकवर जडेजा होता. ५वा बॉल डॉट गेला होता आणि शेवटचा बॉलही असाच गेला. त्यावेळी अंबाती रायडूने डोक्याला हात लावला. त्याचे डोळे पाणावले. रायडूला विश्वासही बसत नव्हता की बंगळुरूने सीएसकेला प्लेऑफमध्ये जाण्यापासून रोखले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -