मुंबई: आवळ्यामध्ये औषधीय गुण भरलेले असतात. आयुर्वेदात आवळ्यामध्ये अनेक पोषकतत्वे सांगितलेली आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने आवळा हे बहुगुणी फळ आहे.
आवळ्यामध्ये आर्यन, पोटॅशियम, व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते.
आवळ्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.
आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात.
केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी आवळा अतिशय फायदेशीर आहे.
याच्या सेवनाने पाचनतंत्रही सुधारते. आवळ्यामुळे रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
दररोज एक आवळा खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारण्यास मदत होते. आवळ्याच्या सेवनाने डोळे निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. यातील व्हिटामिन सी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.
रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यायला असता रोगप्रतिकारक क्षमता, पचनशक्ती तसेच केस निरोगी होतात. दररोज सेवन केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.