Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीYami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

Yami Gautam : यामी गौतमच्या घरी चिमुकल्या पावलांनी आला छोटा पाहुणा!

‘या’ शुभ दिवशी झाला बाळाचा जन्म

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि तिचा पती दिग्दर्शक आदित्य धर (Aditya Dhar) यांनी त्यांच्या चाहत्यांना एक खुशखबर दिली आहे. यामीच्या घरी चिमुकल्या पावलांनी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. यामीला अक्षय तृतीयेच्या (Akshay Tritiya) दिवशी म्हणजेच १० मे ला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. याबाबत या जोडप्याने आज आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर करत ही बातमी सांगितली आहे.

‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाच्या शूटिंगवेळी यामी गरोदर होती. त्यामुळे चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये ती सहभाग घेऊ शकली नाही. आपण गरोदर असल्याने चित्रपटाच्या प्रोमोशनमध्ये सहभागी होणार नसल्याचे यामीने जाहीर केले होते. यामीने गुड न्यूज दिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. आज यामीने सोशल मीडियावर आपल्याला बाळ झाल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.

यावेळेस उभयतांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यामी ज्या हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होती त्या हॉस्पिटलच्या स्टाफ आणि डॉक्टर्सचे आभार मानले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, ‘आम्ही सूर्या हॉस्पिटलमधील अपवादात्मकपणे समर्पित आणि अद्भुत वैद्यकीय व्यावसायिकांचे, विशेषत: डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनःपूर्वक आभार मानू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला.

आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने अपेक्षा करतो. त्याने गाठलेल्या प्रत्येक मैलाच्या दगडासह, तो आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आपल्या प्रिय राष्ट्रासाठी अभिमानाचा दीपस्तंभ बनेल अशी आम्हाला आशा आणि विश्वास आहे’. यामीने आपल्या बाळाचं नाव ‘वेद्विद’ ठेवलं आहे. चाहते या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Dhar (@adityadharfilms)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -