Tuesday, October 8, 2024
HomeदेशLok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले

फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील फुलपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सभेत मोठा गदारोळ झाला. अचानक जमाव नियंत्रणाबाहेर गेला आणि स्टेजभोवती लावलेले बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी झाल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त जाहीर सभा होणार होती. राहुल-अखिलेश येताच कार्यकर्ते अचानक अनियंत्रित झाले आणि स्टेजवर पोहोचले. हा गोंधळ इतका प्रचंड होता की दोन्ही नेते भाषण न करता तेथून निघून गेले. या गोंधळात अनेक जण जखमीही झाले आहेत. या गोंधळाचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या पोलीस या जमावाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी रांचीमध्येही इंडिया आघाडीच्या सभेत गदारोळ झाला होता.

अलाहाबादमध्ये काँग्रेस, तर फुलपूरमध्ये सपाचा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दोघांच्या समर्थनार्थ ही संयुक्त रॅली काढण्यात येणार होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -