जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे मुंबई हायकोर्टाचे आदेश!
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणा-या लोकल ट्रेनमध्ये गर्दीमुळे पडून झालेला मृत्यू हा अपघात आहे. या अपघाताची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची आहे. त्यामुळे अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांना ४ लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश देखील मुंबई हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत. तीन महिन्यात भरपाई न दिल्यास १२ टक्के व्याज दराने रक्कम वसूल करण्यात येईल, असा इशारा देखील कोर्टाने दिला आहे.
मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे अनेक अपघात होता. यात खांबाला धडकून, खाली पडून होणा-या अपघातांची संख्या देखिल वाढली आहे. त्यामुळे कोर्टाने यावर चिंता व्यक्त केली आहे.
आईसोबत नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघालेल्या २४ वर्षीय तरुणाचा ठाकूर्ली-डोंबिवलीदरम्यान खांबाची धडक बसल्याने मृत्यू झाला होता. शुक्रवारी ही घटना घटली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणावर पाच दिवस रुग्णालयात उपचार सुरू होते.
दुस-या घटनेत उल्हासनगर येथे राहणा-या पद्मनन्ना पिरांन्ना पुजारी (वय ५५) यांचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाला. पद्मन्ना पुजारी हे मुंबईत कामाला होते.
तिस-या घटनेत दिवा आणि कोपर रेल्वे स्थानकादरम्यान स्थानिक नागरिक रेल्वे रूळ ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना अज्ञात लोकलने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची घटना रात्री ८.४५ च्या सुमारास घडली.