Thursday, May 8, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

Bomb Threat : दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार

पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आल्याने खळबळ


मुंबई : बसमधून प्रवास करत असताना दोन लोक दादर येथील मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकल्याचे नियंत्रण कक्षाला फोन करणा-याने सांगितल्याने पोलिसांची पळापळ सुरु झाली आहे.


रविवारी सकाळी मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता, ज्यामध्ये फोन करणा-याने मुंबईतील दादर भागात असलेल्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार असल्याची माहिती दिली.





त्याने सांगितले की, तो बसमध्ये प्रवास करत होता तेव्हा त्याने दोन लोक मॅकडोनाल्ड उडवण्याबद्दल बोलत असल्याचे ऐकले.


यानंतर पोलिसांनी सतर्कता दाखवत संपूर्ण तपास केला. मात्र त्यांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.


दरम्यान मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी ६ जागांवर मतदान होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभिर्याने घेतले आहे.


दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यासह सांगली, मिरज, कोल्हापूर आणि सोलापूरातील रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी सांगली पोलिसांना फोन करून देण्यात आली होती. त्यानंतर आज सांगली पोलिसांनी मुंबई लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.

Comments
Add Comment