मुंबई: रिलायन्स जिओकडे(reliance jio) सध्या यावेळे ४६ कोटींपेक्षा अधिक लोकांचा कस्टमर बेस आहे आणि आता जिओ एक वर्ष म्हणझेच ३६५ दिवस चालणारा नवा प्रीपेड प्लान घेऊन येत आहे. या प्लानची किंमत ३३३३ रूपये ठेवण्यात आली आहे. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यात FanCodeचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळते.
FanCode हा एक स्पोर्ट्स स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे जो क्रिकेटसह फुटबॉल, फॉर्म्युला १ आणि दुसऱ्या खेळांना स्ट्रीम करतो. याच्या महिन्याच्या प्लानची किंमत २०० रूपये आहे आणि वार्षिक प्लानची किंमत ९९९ रूपये आहे. मात्र रिलायन्स जिओच्या या पॅकसोबत याचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळते.
३३३३ रूपयांच्या प्लानमध्ये FanCodeचे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये मिळतेच यासोबतच ३६५ दिवसाच्या व्हॅलिडिटीच्या हिशेबाने पाहिल्यास एका दिवसाच्या नेटची किंमत ९.१३ आहे. यात युजरला ३६५ दिवसाला २.५ जीबी डेटा दररोज, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, १०० एसएमएसची सुविधा मिळते. या प्लानमध्ये मिळणाऱ्या अतिरिक्त फायद्यामध्ये जिओ सिनेमा, जिओ टीव्ही आणि जिओ क्लाऊडचाही समावेश आहे.
या प्लानसोबत युजर्सला अनलिमिटेड ५जी डेटाही मिळेल. जर तुमच्या भागात जिओची सर्व्हिस उपलब्ध आहे आणि तुमचा फोन ५ जीवर चालत आहे तर तुम्हीही अनलिमिटेड ५जी डेटा ऑफरचा लाभ घेऊ शकता.