काशी व मथुरेमध्ये मंदिर बांधण्यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केलेले दावे नड्डा यांनी फेटाळून लावले.
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर काशी-मथुरेतेही मंदिर उभारले जाणार अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झाली. मात्र, काशी अथवा मथुरेत मंदिर उभारणीचे भाजपचे कोणतेही नियोजन नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्पष्ट केले आहे.
वाजपेयींच्या काळात पक्ष चालवण्यासाठी आरएसएसची गरज होती. त्यावेळी भाजप लहान पक्ष होता. सुरुवातीला आम्ही थोडे अकार्यक्षम होतो, त्यामुळे पक्षाला आरएसएसची गरज होती. मात्र आता भाजप ताकदवान झाल्याचे वक्तव्य नड्डा यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यातच नड्डा यांनी काशी-मथुरेतील वादग्रस्त जागेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, काशी किंवा मथुरेमध्ये मंदिर उभारणीची भाजपची कोणतीही प्लॅन योजना नसल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात अनेकांकडून भावनिक दावे केले जात असल्याचंही ते म्हणाले.