MI vs LSG: मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनौचा सलामीवीर देवदत्त पडीक्कल याला पहिल्याच षटकात नवीन तुषाराने परत पाठवले. त्यानंतर आलेल्या मार्कस स्टॉयनिसने केएल राहुलसोबत चांगली भागीदारी केली. मात्र पीयुष चावलाने २८ धावांवरच त्याला बाद केले. दिपक हुडा देखील संघासाठी खास खेळी करु शकला नाही.
त्यानंतर आलेल्या निकोसल पुरनने कर्णधार राहुलला साथ देत २९ चेंडुत ७५ धावांची आक्रमक खेळी केली. पुरनच्या खेळीने लखनौच्या धावसंख्येला आघाडी मिळाली. राहुलने देखील ४१ चेंडुत ५५ धावा बनवल्या. पण पीयुष चावलाच्या चेंडुवर तुषाराच्या हातात तो झेलबाद झाला. २० षटकाच्या खेळीत लखनौने २१४ धावा बनवल्या.
मुंबईसमोर २१५ धावांच आव्हान असताना दोन्ही सलामीवीरांनी आक्रमक खेळी केली. ब्रेविस मात्र २३ धावांवरच परतला. त्यानंतर आलेल्या सुर्यकुमार यादवला खातंही उघडता आलं नाही. क्रुणाल पंड्याच्या चेंडुवर तो झेलबाद झाला. रोहित शर्माने संघासाठी आक्रमक सुरवात करत संघासाठी ३८ चेंडुत ६८ धावा बनवल्या. कर्णधार हार्दिक पंड्याकडुन अपेक्षा असताना देखील तो १६ धावांवर बाद झाला. नमन धीर आणि इशान किशनने संघासाठी अर्धशतकीय खेळी केली. मात्र किशन १४ धावा बनवुन बाद झाला. धीरने २८ चेंडुत ६२ धावा बनवुन संघाला आव्हानाच्या जवळ आणलं, पण विजय मिळवुन देण्यात असमर्थ ठरला. मुंबईचा तब्बल १८ धावांनी पराभव झाला. त्याचबरोबर मुंबईने स्पर्धेत १० सामने गमावले.