Wednesday, March 26, 2025
HomeदेशLok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाची कारवाई, आतापर्यंत जप्त केले तब्बल ८८८९...

Lok Sabha Elections 2024: निवडणूक आयोगाची कारवाई, आतापर्यंत जप्त केले तब्बल ८८८९ कोटी

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४च्या(loksabha election 2024) पाचव्या टप्प्याचे मतदान २० तारखेला होणार आहे. यातच निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. यासाठी निवडणूक आयोगाकडून मोठी कारवाई केली जात आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीदरम्यान अवैध पैसे, नशेसाठीचे पदार्थ जप्त करण्याचा रेकॉर्ड बनवला आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीदरम्यान जप्त केलेल्या गोष्टींचा आकडा ८८८९ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला आहे. यात ४५ टक्के जप्त केलेल्या गोष्टी औषधे आहेत. निवडणूक आयोगाने केलेल्या कारवाईत ८८८९ कोटी रूपये जप्त केले आहेत. यात निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की निवडणुकीच्या दरम्यान जप्तीचा हा आकडा ९ हजार कोटी रूपये पार होईल. ४५ टक्के जप्ती ही ड्रग्स आणि नशेच्या पदार्थांची आहे. यावर आयोगाचे विशेष लक्ष आहे.

जप्त केलेल्या गोष्टींमध्ये ४५ टक्के नशेबाज औषधे

निवडणूक आयोगाच्या मते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने लोकसभा निवडणुकीच प्रलोभने देणाऱ्यांवर कडक करावाई केली जात आहे. या दरम्यान, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूक अवैध धन, नशेबाज पदार्थ, फ्री बीज आणि महागड्या धातूंचे जप्त करण्याचा रेकॉर्ड केला आहे.

गेल्या काही वर्षात गुजरात, पंजाब, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा आणि मिझोरममधील निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात जप्ती करण्यात आली. आयोगाच्या माहितीनुसार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गेल्या महिन्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा करताना हे धनबल हे मुख्य आव्हान असल्याचे म्हटले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -