मुंबई: विराट कोहलीने चेन्नई सुपरकिंग्सविरोधात आयपीएल सामन्यात रेकॉर्ड्सची बरसात केली आहे. विराट कोहलीचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. त्याने एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये ३ हजाराहून अधिक धावा पूर्ण केल्या. आयपीएलमध्ये एखाद्या सिंगल ठिकाणी ही कामगिरी करणारा विराट पहिला फलंदाज ठरला आहे. कोहलीने २९ बॉलमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ४७ धावा केल्या. ३५ वर्षीय कोहलीने आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा ७००चा आकडा पार केला.
विराट कोहली आयपीएल २०२४मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने या हंगामात १५५.६०च्या स्ट्राईक रेटने सर्वाधिक ७०८ धावा केल्या आहेत यात एक शतक आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने या दरम्यान ५९ चौकार आणि ३७ षटकार ठोकले आहेत.
आयपीएलमध्ये एका हंगामात २ वेळा ७०० हून अधिक स्कोर करणारा कोहली पहिला भारतीय ठरला. या बाबतीत त्याने क्रिस गेलशी बरोबरी केली. गेलनेही आयपीएलमध्ये २ वेळा ७०० प्लस स्कोर केला आहे. कोहलीने कर्णधार फाफ डू प्लेसिससोबत मिळून पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. विराटने याआधी २०१६ आयपीएलमध्ये ४ शतकांच्या मदतीने सर्वाधिक ९७३ धावा केल्या होत्या.