Ipl 2024: मुंबई इंडियन्सच्या नावावर या लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद

मुंबई: लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४मधील(ipl 2024) ६७व्या सामन्यात हरवले. लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१४ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला केवळ १९६ धावाच करता आल्या. मुंबईने एका हंगामात सर्वाधिक सामन्यात पराभव मिळवण्याच्या आपल्याच रेकॉर्डशी बरोबरी केली आहे. मुंबईला आयपीएल २०२४मध्ये १० पराभवाचा सामना करावा लागला आहे.


याआधी २०२२मध्येही मुंबईने १० पराभवांचा सामना केला आहे.मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएल २०२४मध्ये पॉईंट्स टेबलमध्ये सर्वात खालच्या स्थानावर राहिला. ते या हंगामात १४ सामने खेळले या दरम्यान केवळ त्यांना ४ सामन्यात विजय मिळवता आला. तर १० सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने सुरूवातीला तीन सामन्यात सलग पराभव पाहिला. त्यांना गुजरात, हैदराबाद आणि राजस्थानने हरवले. त्यानंतर दिल्ली, लखनऊ आणि कोलकातानेही हरवले.


मुंबईला २००९मध्ये ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर २०१४ आणि २०१८मध्ये ८-८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर २०२२च्या हंगामात मुंबईने १० सामने गमावले होते आणि आता २०२४मध्ये संघाने १० सामने गमावले आहेत.


मुंबईने आपल्या घरच्या मैदानावर खेळलेल्या ७ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळवला. तर ४ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसऱ्या मैदानांवर केवळ १ सामना जिंकला आणि ६मध्ये पराभव स्वीकारला.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.