मुंबई: स्मार्टफोन्सच्या किंमती बऱ्याच वाढल्या आहेत. आधी जो रेडमी नोट सीरिजमधील फोन १० ते १५ हजार रूपयांना मिळत होता तोच स्मार्टफोन आता २० ते ३० हजारांवर पोहोचला आहे.
अशातच अनेक युजर्स सेकंड हँड स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करतात. जर तुम्हाला योग्य बजेटमध्ये चांगला फोन मिळत असेल तर हा पर्यायही चांगला ठरू शकतो. काही वेबसाईट अशा आहेत की ज्या सेकंड हँड फोन विकतात. असा फोन खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
सगळ्यात फोनची फिजीकल कंडिशन चेक करा. तुम्ही स्क्रॅच, डेंट अथवा इतर गोष्टी पाहिल्या पाहिजेत. स्क्रीन क्रॅक आणि बटन्सवर लक्ष दिले पाहिजे. तसेच हा फोन किती जुना आहे हे ही पाहिले पाहिजे. कारण अनेक जुन्या फोन्सवर सॉफ्टवेअर अपडेट मिळत नाही. त्यामुळे नवीन अॅप्स त्यावर चालत नाहीत.
बॅटरीचे आरोग्य तपासणे अतिशय महत्त्वाचे आहे. तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन फोनच्या बॅटरीचे आरोग्य तपासू शकता. तसेच किती बॅकअप मिळतो हे ही तपासा. सेकंड हँड फोन खरेदी करताना हे लक्षात ठेवा की त्यावर लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट्स मिळायला हवेत. जुन्या फोनमध्ये सिक्युरिटी डिव्हाईसबाबत त्रास होऊ शकतो.
याशिवाय IMEI नंबरही चेक केला पाहिजे. कारण यावरून समजते की तुम्ही जो फोन खरेदी करत आहात तो चोरीचा तर नाहीये ना? यासाठी ओरिजिनल बिलही मागवले पाहिजे.
याशिवाय फोनच्या स्टोरेजवरही लक्ष दिले पाहिजे. जर तुम्ही कमी स्टोरेजचा फोन खरेदी करत आहात तर त्यावर मर्यादित अॅप्स वापरू शकता.
तसेच फोनची किंमतही पाहणे तितकेच गरजेचे आहे. हे सगळ्यात गरजेचे आहे. तुम्ही फोनची मार्केट व्हॅल्यू चेक केली पाहिजे.