Tuesday, August 5, 2025

Weather Update : उन्हाचा चटका कमी होणार! महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा कायम

Weather Update : उन्हाचा चटका कमी होणार! महाराष्ट्रात वादळी पावसाचा इशारा कायम

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट


मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावली आहे. राज्यभरात पूर्वमोसमी पावसाच्या सरी कोसळत आहेत मात्र सकाळपासूनच उन्हाचा चटका आणि उकाडा कायम जाणवत आहे. यापासून नागरिकांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याकडून (Meteorological Department) आज महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याची शक्यता आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथे काल सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उच्चांकी ४२.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पारा ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता. तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. ढगाळ आकाशामुळे उन्हाचा चटका कमी झाला असून, तापमान कमी-जास्त होत आहे.



'या' जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता



  • जळगाव, नाशिकमध्ये पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

  • अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

  • पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

  • मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (५०-६० किमी प्रतितास वेग) व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • तर उत्तर कोकणातील तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट


जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे.


Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >