Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीSingapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८...

Singapore News : कंपनी झाली मालामाल! बोनस म्हणून कर्मचाऱ्यांच्या हाती चक्क ८ महिन्यांचा पगार

जाणून घ्या नेमकं कसं उजळलं कर्मचाऱ्यांचं नशीब

सिंगापूर : साधारणत: कंपन्यांकडून सणासुदीला किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो आणि हा बोनस एक किंवा दोन महिन्यांचा असतो. मात्र एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल ८ महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिला आहे. या कंपनीला कोट्यावधी रुपयांचा नफा झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठ्या स्वरुपात बोनस दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचं नशीब चांगलंच उजळलं आहे. या गोष्टीची जगभरात तुफान चर्चा होत आहे.

सलग दुसऱ्या वर्षी कंपनीचा घसघशीत नफा

‘सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड’ असं या कंपनीचं नाव आहे. सिंगापूरमधील या सर्वात मोठ्या विमान वाहतूक कंपनीने सर्व कर्मचाऱ्यांना ८ महिन्यांचा पगार बोनस म्हणून दिल्याची माहिती मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी कंपनीला घसघशीत नफा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मागील वर्षाच्या कमाईपेक्षा यंदाच्या वर्षी कंपनीने अधिक नफा कमावला आहे. त्यामुळेच कंपनीने नफ्यामधून ६.६५ महिन्यांचा पगार कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून दिला असून साथीच्या काळातील भरपाई म्हणून १.५ महिन्यांचा अतिरिक्त पगार प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात आला आहे.

आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये या कंपनीने मागील वर्षापेक्षा २४ टक्के अधिक नफा कमवला आहे. कंपनीने कमवलेला नफा हा २.६७ बिलियन सिंगापूर डॉलर्स इतका आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार हा नफा १६,५३० कोटींहून अधिक रुपयांचा आहे. साथीच्या आजारानंतर परिस्थिती सर्वसामान्य होत असताना विमान प्रवासाची मागणी वाढत आहे. त्यामुळेच कंपनीला सातत्याने नफा होत आहे. कंपनीच्या कार्गे सेवेलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मार्च महिन्यामध्ये या विमान कंपनीच्या ९७ टक्क्यांहून अधिक विमानं पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करत होते.

या कंपनीनेही कर्मचाऱ्यांना दिला पाच महिन्यांचा बोनस

केवळ सिंगापूर एअरलाइन्स नाही तर एमिरिट्स एअरलाइन्सनेही त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यांचा बोनस दिला आहे. एमिरिट्सला ५.१ बिलियन अमेरिकी डॉलर्सचा नफा झाला त्यातून त्यांनी कर्मचाऱ्यांना हा बोनस दिला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -