मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरीय क्षेत्रांमध्ये उकाडा दर दिवसागणिक वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा जाणवत होता, मात्र आता पुन्हा वाढत्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना मुंबईकरांसमोर आता आणखी एक संकट उभं राहणार आहे.
मुंबई शहरातील महत्त्वाच्या भागात २२ ते २३ मे दरम्यान पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक कार्यालयं आणि रहिवासी भाग असणाऱ्या मुंबईतीत या भागातील नागरिक, सदनिकांना प्रशासनाच्यावतीने पाणी जपून वापरण्याचं आणि पाण्याचं नियोजन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांना आता उन्हात अंगाची लाही लाही होत असताना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी, जोगेश्वरी, विले-पर्ले, गोरेगाव आणि ओशिवरासह नजीकच्या भागात २२ मे ते २३ मे दरम्यान १६ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित होणार आहे. नव्यानं बसवण्यात आलेल्या १५०० मिमी व्यासाच्या आणि १२०० मिमी व्यासाच्या (पार्ले क्षेत्र) दोन महत्वाच्या जलवानहिनी जोडण्यासाठी म्हणून पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. बी डी सावंत रोड, सी जी रोडपासून पुढे सी जी रोड आणि अंधेरीतील सहार रोड पूर्व पर्यंतच्या टप्प्यामध्ये पालिकेकडून हे काम हाती घेण्यात येणार आहे.
२२ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून पालिका कर्मचारी हे काम हाती घेणार असून, त्याच मध्यरात्रीनंतर १ वाजता हे काम पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पालिकेकडून हे काम पूर्ण होताच वेरावली जलाशय १, २ आणि ३ मधील पाणीपातळी सुधारणार असून, त्याचा फायदा अंधेरी, जोगेश्वरी आणि विलेपार्ले भागाला होणार आहे. दरम्यान या संपूर्ण जोडणी काम सुरु असण्याच्या प्रक्रियेमुळे के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण भाग सर्वाधिक प्रभावित होणार असून, तेथील पाणीपुरवठा बंद राहील.
मोरागाव, जुहू गावठाण (दुपारी २.३०ते सायंकाळी ४.४०), यादव नगर, सहकार मार्ग, बांदिवली हिल, मोमीन नगर, खजूरवाडी, जोगेश्वरी फाटक, जोगेश्वरी स्थानक मार्ग, कॅप्टन सामंत मार्ग (रात्री ९.३० ते रात्री १२), गिल्बर्ट हिल, सागर सिटी, गावदेवी डोंगरी, जुहू गल्ली, वायरलेस मार्ग, श्रीनाथ नगर (रात्री १० ते मध्यरात्री १२.३०)
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…