Saturday, October 5, 2024
Homeताज्या घडामोडीMonsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; 'या' ठिकाणी जायचा आत्ताच...

Monsoon Trip : काही दिवसांवर येऊन ठेपला पावसाळा; ‘या’ ठिकाणी जायचा आत्ताच बेत आखा!

मुंबई : पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच आता निसर्गप्रेमींचे पावसाळी पिकनिकचे प्लॅन बनतील. महाराष्ट्रातील सुंदर डोंगररांगांमध्ये अशी अनेक मनमोहक ठिकाणे आहेत, जिथे पावसाळ्यात भेट देण्याचा आनंद वेगळाच असतो. म्हणूनच, आज तुम्हाला महाराष्ट्रातील अशा काही सुंदर ठिकाणांबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही मान्सूनचा पुरेपूर आनंद घेऊ शकता.

१.लोणावळा / खंडाळा-पुणे :- मुंबई महामार्गावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर हे थंड हवेचं ठिकाण आहे. इथे असलेली हिरवीगार वन्य शोभा,डोंगरमाथे, दऱ्या, पावसाळ्यात डोंगरातून वाहणारे धबधबे हे मनाला मोहून टाकणारे आहेत. पावसाळ्यात इथले सौंदर्य बहरून जाते.

२.ताम्हिणी घाट :- गोवा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १४० किमी अंतरावर असणारे हे ताम्हिणी घाट पर्यटकांचे आवडीचे ठिकाण आहे. हिरवेगार सौंदर्य,खोल दऱ्या,मुळशी धरण, डोंगरावरून पडणारे धबधबे हे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतात. येथे जवळच ३० किमी च्या अंतरावर सिंहगड किल्ला देखील प्रेक्षणीय आहे.

३.माळशेज घाट :- पावसाळ्यात महाराष्ट्रातील सुंदर ठिकाणांमध्ये माळशेज घाटाचा उल्लेख नक्कीच होतो. समुद्रसपाटीपासून ७ हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर असलेला माळशेज घाट पावसाळ्यात एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट आहे आणि ट्रेकर्स प्रेमींमध्ये हे ठिकाण प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात माळशेज घाटात सर्वत्र हिरवळ असते. पावसाळ्यात येथील पर्वत ढगांनी झाकलेले असतात. थंड हवेच्या झुळूकांमध्ये अनेक ठिकाणी सुंदर धबधबेही पाहायला मिळतात.

४.पाचगणी :- पाचगणी हिल स्टेशन हे सह्याद्रीच्या पर्वत रांगेतील पाच टेकड्यांनी वेढलेले अतिशय सुंदर आणि लोकप्रिय ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगेने वेढलेले असल्याने पावसाळ्यात त्याचे सौंदर्य अगदी नयनरम्य असते. पाचगणी हिल स्टेशन विशेषतः पावसाळ्यात निसर्गप्रेमी आणि साहसप्रेमींना आकर्षित करते.

५.इगतपुरी :- इगतपुरी तालुक्याला निसर्गाने भरभरून दान दिले आहे. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच असल्याने इथे वर्षभर आल्हाददायक वातावरण असते. भरपूर वनसंपदा आणि जलसंपदा असल्याने प्रत्येकाला निसर्ग अगदी जवळून अनुभवायला मिळतो. भातसा नदीचे पात्र, आर्थर लेक, कळसुबाई शिखर, अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.

६.भीमाशंकर :- पुण्यातील जिल्ह्यात असणारे भीमाशंकर हे घनदाट अभयारण्य समृध्द असे ठिकाण आहे. भीमा नदीचा उगमही याच अरण्यातून होतो. हे ठिकाण उंचावर असल्याने पावसाळ्यात अगदी डोळ्याचे पारणे फेडणारे सौंदर्य निसर्गाने इथे उधळलेले असते. येथील गुप्त भीमाशंकर, कोकणकडा, सितारामबाबा आश्रम, नागफणी इ. ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -