Thursday, December 12, 2024
Homeताज्या घडामोडीManoj Jarange : दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल

Manoj Jarange : दौऱ्यादरम्यान मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; रुग्णालयात केलं दाखल

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे सध्या महाराष्ट्र दौरा करत आहेत. परंतु आज अचानक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दौरा अर्धवट सोडावा लागला. दौऱ्यादरम्यान वाढत्या उन्हामुळे मनोज जरांगे यांना अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे त्यांना दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून आरक्षणाची मागणी होत आहे. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे या मागणीचे नेतृत्व करत आहेत. या मागणीबाबत मनोज जरांगे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून त्यांनी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. यासाठी ते महाराष्ट्र दौरा करत आहेत. मात्र अशक्तपणा जाणवत असल्यामुळे त्यांना हा दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरमधील गॅलक्सी रुग्णालयात उपचारांकरीता दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांकडून जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तपासणी सुरू आहे. सतत होणारे दौरे आणि उन्हामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील हे बीडमध्ये तब्बल ९०० एकरात जाहीर सभा घेणार होते. ८ जून रोजी त्यांची ही सभा होणार होती. मात्र भीषण दुष्काळामुळे त्यांची ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून उपोषणाचीही घोषणा केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -