सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भगव्याचा अवमान केला
चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरु असतानाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदूंची अस्मिता असलेल्या भगव्या ध्वजावरुन अत्यंत खालच्या पातळीची टीका केली. संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही, असं बेताल वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला आहे. ‘भगव्या ध्वजाला फडकं म्हणणं हा उद्धव ठाकरेंचा नतद्रष्टेपणा आहे’, असा घणाघात बावनकुळे यांनी केला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर एक पोस्ट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पोस्टमध्ये म्हटलं आहे की, परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतद्रष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवाने सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत.
पुढे बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…
कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥
भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला. हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण… pic.twitter.com/csD9sFAvmG
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 17, 2024