Sunday, July 7, 2024
Homeक्राईमBeed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

Beed cash seized : बीडमध्ये पोलीस निरीक्षकाच्या घरी सापडली १ कोटींची रोकड!

९७० ग्रॅम सोने आणि ५ किलो चांदीही केली जप्त

बीड : बीड शहरातील एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे (Haribhau Khade) यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) झडती घेण्यात आली. या झाडाझडतीमध्ये खाडे यांच्या घरातून एक कोटी आठ लाख रुपयांची रोकड (Cash) त्यासोबत ९७० ग्रॅम सोने व पाच किलो चांदी (Silver) जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खाडे याच्या नावावर पाच ते सहा ठिकाणी असलेल्या मालमत्तांची कागदपत्रेही यावेळी पोलिसांच्या हाती लागली आहेत.

एक कोटी रुपयांच्या लाच प्रकरणातील प्रमुख आरोपी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे व सहाय्यक फौजदार रविभूषण जाधवर हे फरार झाले आहेत.

काय आहे प्रकरण ?

बीड शहरातील जिजाऊ मल्टीस्टेट सहकारी बँकेमध्ये गतवर्षी १०० कोटीचा घोटाळा झाला होता. या प्रकरणी प्रमुख बबन शिंदे तसेच अध्यक्ष अनिता शिंदे यांच्यासह चार जणांवर गुन्हे दाखल झाले होते. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या हरिभाऊ खाडे यांच्याकडे होता. याच प्रकरणांमध्ये आरोपी बबन शिंदे यांनी दोन व्यावसायिकांना बांधकामाचे साहित्य पुरवल्यापोटी ६० लाख रुपये दिले होते. त्यामुळे या दोन्ही व्यावसायिकांची आर्थिक गुन्हे शाखेकडून (Crime Branch) चौकशी सुद्धा सुरू होती.

याच गुन्ह्यामध्ये आरोपी करण्याची भीती दाखवून पीआय खाडे यांनी या दोघांकडे ५० लाख, अशी एकूण एक कोटी रुपयांची लाच मागितली होती. अखेर ३० लाखात तडजोड झाली होती. यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता देत असतानाच खासगी व्यापारी कुशाल जैन याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चार महिन्यांपासून खाडे हे त्यांना त्रास देत होते. अखेर १३ मे रोजी रात्री उशिरा बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर १४ मे रोजी खात्री केली. १५ मे रोजी पैसे घेऊन तक्रारदार खाडे यांच्याकडे गेला होता. यावर खाडे याने आपण पुण्याला आलो असून जैन या व्यापाऱ्याकडे पैसे देण्यास सांगितले. जैनने पैसे स्विकारताच एसीबीने त्याला पकडले. त्यानंतर खाडे आणि हवालदार जाधवर यांचा शोध सुरू केला. उपअधीक्षक शंकर शिंदे, भारत गारदे, अमोल खरसाडे, अविनाश गवळी, हनुमंत गोरे, सुरेश सांगळे आणि अंबादास पुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -