
ठाणे : आमचे विचार हे बाळासाहेबांचे विचार, आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. त्यांची विचारधारा जी आहे ती सावरकरांची बदनामी करणारी. त्यांच्यासोबत काँग्रेस जे पाकिस्तानची बोली बोलतात ते बसतात असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी उल्हासनगर येथील एका सभेमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर शिवसेना शिंदे गट व ठाकरे गट एकत्र येतील असं विधान केलं होतं. याबाबत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे विचार बाळासाहेबांचे विचार, आमची शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे. शिवसेना-भाजप वैचारिक भूमिका आम्ही घेतलेले आहे. त्या वैचारिक भूमिकेनुसार बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. आणि म्हणून हे सरकार जे आहे सर्वसामान्यांच्या मनातल्या सरकार आहे. आमची विचारधारा ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. त्यांची विचारधारा जी आहे ती सावरकरांची बदनामी त्यांना चालते, औरंगजेबाची बाजू ते घेतात. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जे पाकिस्तानी बोली बोलतात ते बसतात असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
मुंबईतील महायुतीच्या सभांबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी येणार म्हणजे तयारी करावी लागत नाही. जनता स्वतः त्यांच्यासाठी आतुरलेली असते. त्यांचे विचार ऐकण्यासाठी त्यांना बघायला आतुरलेली असते. देशात नव्हे तर जगातले लोकप्रिय नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शुक्रवारी शिवाजी पार्कवरदेखील सगळे ऐकायला लाखो लोक येतील, असे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.