PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेसाठी वाहतुकीत 'हे' मोठे बदल

जाणून घ्या काय आहेत पर्यायी मार्ग


मुंबई : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभरात मोठमोठ्या नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. सध्या मुंबईत लोकसभा (Mumbai Election) निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार सभा शिगेला पोहोचला आहे. मुंबईतील लोकसभा मतदारसंघावर पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) विशेष लक्ष देताना दिसत आहे. काल पंतप्रधान मोदी यांचा रोड शो झाला. यावेळी मोदींना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.


यानंतर उद्या मुंबईमधील दादर शिवाजी पार्क येथे पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र जंगी सभा होणार आहे. दोन्ही दिग्गज नेते एकाच मंत्रावर दिसणार असल्यामुळे सभेला मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर दादरमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही मार्ग बंद केले असून नागरिकांसाठी इतर पर्यायी मार्ग उपलब्ध करुन दिले आहेत.



'या' ठिकाणी वाहने उभी करण्यास प्रतिबंध


१. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग : बाबासाहेब वरळीकर चौक (सेन्च्युरी जंक्शन) ते हरी ओम जंक्शन, माहिम
२. संपूर्ण एम. बी. राऊत मार्ग, शिवाजीपार्क, दादर.
३. संपूर्ण केळूस्कर रोड दक्षिण आणि केळुस्कर रोड उत्तर, शिवाजीपार्क, दादर
४. एन. सी. केळकर मार्ग: हनुमान मंदिर सर्कल ते गडकरी जंक्शन, शिवाजीपार्क, दादर.
५. टी. एच. कटारीया मार्ग : गंगाविहार जंक्शन ते आसावरी जंक्शन, माहिम.
६. पांडुरंग नाईक मार्ग, (शिवाजीपार्क रोड नं. ५), शिवाजीपार्क, दादर,
७. दादासाहेब रेगे मार्ग, शिवाजीपार्क, दादर
८. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड महेश्वरी सर्कल ते कोहिनूर जंक्शन, दादर (पूर्व)
९. टिळक रोड: कोतवाल गार्डन सर्कल, दादर (पश्चिम) ते आर. ए. किडवाई रोड, माटुंगा (पूर्व)
१०. गफारखान रोड सी लिंक गेट ते जे. के. कपूर चौक ते बिंदू माधव ठाकरे चौक.
११. थडानी मार्ग: पोददार हॉस्पीटल जंक्शन ते बिंदू माधव ठाकरे चौक.
१२. डॉ. अॅनी बेझंट रोड पोद्दार हॉस्पिटल जंक्शन ते डॉ. नारायण हर्डीकर जंक्शन.
१३. दिलीप गुप्ते मार्ग: शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड, शिवाजीपार्क, दादर.
१४. एल. जे. रोड : गडकरी जंक्शन, दादर ते शोभा हॉटेल, माहिम.



वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था



  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग उत्तर वाहिनी - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक जंक्शन (सिध्दिविनायक मंदिर जंक्शन उजवे वळण घेऊन एस. के. बोले रोड, आगार बाजार, पोतुर्गीज चर्च, डावे वळण गोखले रोड किंवा एस. के. बोले मार्ग या रस्त्यांचा वापर करावा)

  • स्वातंत्रवीर सावरकर मार्ग दक्षिण वाहिनी येस बँक जंक्शन ते सिध्दिविनायक मंदिर जंक्शन (दांडेकर चौक येथे डावे वळण घेऊन पांडूरंग नाईक मार्गे राजाबढे चौक येथे उजवे वळण घेवून एल. जे. रोड मार्गे गोखले रोड किंवा एन. सी. केळकर रोड या रस्त्यांचा वापर करावा)


Comments
Add Comment

राज्यातील २९ महापालिकांच्या सत्तेची दारे आज उघडणार

राज्यभरात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद; आज निकाल, १५ हजार ९३१ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत कैद मुंबई : राज्यातील

मुंबईत भाजप महायुतीला कौल

ठाकरेंच्या २५ वर्षांच्या सत्तेला सुरुंग; एक्झिट पोलनुसार पुणे आणि पिंपरीत भाजपची सत्ता मुंबई  : मुंबईत उबाठा

उद्धव ठाकरे यांचे विधान आचारसंहिता भंग करणारे ? मंत्री एँड आशिष शेलार यांचा सवाल

ठाकरेंचे सल्लागार सडके आणि हे रडके मुंबई : एखादा सराईत असतो त्या पद्धतीने उद्धव ठाकरे हे वारंवार निवडणुकीच्या

Devendra Fadanvis : हवं तर ऑईल पेंट वापरा, पण विनाकारण...; शाईच्या वादावर फडणवीसांचा राज ठाकरेंना खोचक टोला

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी सकाळी साडेसात

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या तरतूदीसंदर्भातील आदेश जुनाच

मुंबई : महानगरपालिका निवडणूकांच्या प्रचाराची समाप्ती झाल्यानंतर घरोघरी जाऊन प्रचार करण्यासंदर्भात राज्य