Tuesday, July 9, 2024
Homeताज्या घडामोडीMohit Kamboj : महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप; उबाठा आणि शरद पवार...

Mohit Kamboj : महाराष्ट्रात पुन्हा होणार राजकीय भूकंप; उबाठा आणि शरद पवार गट फूटणार!

भाजपा नेते मोहित कंबोज यांचा मोठा दावा

मुंबई : देशभरात निवडणुकीच्या रणधुमाळीत लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) शेवटच्या टप्प्यात प्रचाराचा रंग आणखी चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्याची एकही संधी सोडत नाहीत. सध्या निवडणुकीचे पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान २० मे रोजी पार पडत आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला ४ जूनच्या निकालाचे वेध लागली. मात्र, त्यापूर्वी भाजपाचे (BJP) नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. ट्विटच्याआधारे मोहित कंबोज यांनी महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेचे उधाण आले आहे.

मोहित कंबोज नेमकं काय म्हणाले?

मोहित कंबोज यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ४ जून रोजी लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आणखी एक फूट पडणार आहे. दोन्ही पक्षांमधून आमदार, नेते आणि कार्यकर्ते राजीनामा देऊन बाहेर पडतील. हे सर्वजण सध्या इतर पक्षांच्या संपर्कात आहेत, असा दावा मोहित कंबोज यांनी केला आहे.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर खरोखरच ठाकरे गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गटातील उर्वरित आमदार उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवारांची साथ सोडून सत्ताधारी गटात सामील होणार का, हे आगामी काळात स्पष्ट होईल, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -