Thursday, July 25, 2024

परमेश्वराचे अंग

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येच्या दृष्टीने परमेश्वर हा स्वर अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण या स्वरावर सर्व स्वर अवलंबून आहेत. जर त्याचे व्यवस्थित आकलन झाले, व्यवस्थित ज्ञान मिळाले, तर आज जग जे दिसते आहे, त्यापेक्षा खूप वेगळे दिसेल.

आज जगात top to bottom जे तंटे-बखेडे, भांडणे, दंगे-धोपे, युद्ध, लढाया, खूनखराबा हे सगळे चाललेलं आहे, याचे मुख्य कारण एकच ते म्हणजे परमेश्वराबद्दलचे अज्ञान. परमेश्वराबद्दलचे एकदा ज्ञान झाले की, आपल्या जीवनातील जवळ जवळ सगळे प्रश्न सुटतात. हे ज्ञान प्राप्त होणे जितके महत्त्वाचे आहे, तितकाच महत्त्वाचा या ज्ञानाचा जीवनात उपयोग करणे हे होय. ज्ञान प्राप्त झाले; पण त्याचा काहीच उपयोग केला नाही, तर त्या ज्ञानाला काहीच अर्थ नाही.

हा विषय जर नीट समजला, तर समाज परिवर्तन घडवून आणता येईल. समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी, हा विषय महत्त्वाचा आहे, हे लक्षात घेऊन, तो व्यवस्थितरीतीने ऐकलं गेला पाहिजे. परमेश्वराच्या बाबतीत बोलायला लागलो, तर आस्तिक व नास्तिक हे दोघेही खरे नास्तिकच असतात. पण परमेश्वर हा विषय एकदा नीट समजला की, तुम्ही नास्तिक राहणारच नाही. तुम्हाला नीट आकलन होण्यासाठी आपण हा विषय अनेक दृष्टीने पाहिला, अनेक angle, अनेक बाजूंनी पाहिला.

या परमेश्वराचा आणि आपला संबंध कधी येतो? दैनंदिन जीवनात आपण कर्म करत असतो. आपण कर्म केले की, त्याची reaction होत असते. action आणि reaction हे सतत चालूच असते. त्याच्या पोटातच अनेक निसर्गनियम आहेत. As you think so you become. यात As you think ही action आणि so you become ही reaction. Law of replacement, Law of adjustment, Law of force of gravity, Law of cause and effect असे अनेक निसर्गनियम आहेत. त्यांचा जर आपण नीट विचार केला, तर असे लक्षात येईल की, आपले जीवन व निसर्गनियमांचा घनिष्ट संबंध आहे आणि परमेश्वर व निसर्गनियमांचा किती जवळचा संबंध आहे, हे समजले की, परमेश्वर मानवी जीवनात किती महत्त्वाचा हे ध्यानात येते. मी एके ठिकाणी म्हटले होते की, विज्ञानाच्या बापाचा बाप, म्हणजे परमेश्वर.

आपण जे विज्ञान विज्ञान म्हणतो, त्या विज्ञानाचा बाप म्हणजे निसर्गनियम आणि या निसर्गनियमांचा बाप म्हणजे परमेश्वर आहे. हे निसर्ग नियम आले कुठून? आकाशातून खाली पडले नाहीत किंवा जमिनीतून वर आले नाहीत. हे निसर्गनियम परमेश्वराच्या अंगातून आले आहेत. हे विश्व जे निर्माण झाले, अनंतकोटी ब्रह्मांडे निर्माण झाली आहेत, हे सर्व परमेश्वराकडून निर्माण झाले आहे. परमेश्वराने काहीही निर्माण केलेलं नाही, तर परमेश्वराकडून हे सर्व काही निर्माण झाले, हा जीवनविद्येचा महत्त्वाचा सिद्धांत आहे. हे विश्व जसे परमेश्वराकडून निर्माण झाले, तसेच हे निसर्गनियमसुद्धा परमेश्वराकडून निर्माण झाले, म्हणूनच निसर्गाचे नियम व परमेश्वर यांच्यातील संबंध लक्षात घेतला, तर आपला परमेश्वराशी जो संबंध येतो, तो निसर्गनियमांच्याद्वारे येतो. आपल्या जीवनात निसर्गनियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, ही गोष्ट सतत स्मरणात ठेवण्याची आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -