मुंबई : कोकण रेल्वेकडून नोकरी भरतीची जाहिरात (Konkan Railway Recruitment) देण्यात आली आहे. इंजिनियरिंगच्या क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणार्या तरूण तरूणींसाठी ही एक नामी संधी आहे.
कोकण रेल्वेने (Konkan Railway) जारी केलेल्या परिपत्रकामध्ये AEE/कॉन्ट्रॅक्ट, डिझाईन असिस्टंट/इलेक्ट्रिकल, टेक्निकल असिस्टंट/इलेक्ट्रिकल, ज्यु. टेक्निकल असिस्टंट/सिव्हिल अशा विविध पदांसाठी नोकरभरती जाहीर केली आहे. यामध्ये उमेदवाराला ५६ हजार प्रतिमहिना पगार दिला जाणार आहे. एकूण ४२ जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे. यासाठी वॉक ईन इंटरव्ह्यू होणार आहेत.
कोकण रेल्वे मध्ये या भरतीसाठी उमेदवाराकडे इंजिनियरिंगची पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच इंजिनियरिंगच्या पदवी मध्ये विद्यार्थ्यांना किमान ६०% गुण आवश्यक आहेत.
एका वर्षासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना यासाठी अधिकृत वेबसाईट konkanrailway.com वर जाऊन आपला अर्ज अंतिम मुदतीपूर्वी भरायचा आहे. ०५, १०, १२, १४, १९, २१ जून २०२४ या दिवशी उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन केले आहे.