
जाणून घ्या नेमकं काय आहे कारण?
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Election 2024) अखेरचा टप्पा चालू आहे. २० मे रोजी मुंबईत पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) होत आहे. या काळात प्रशासनाकडून (Administration) आचारसंहितेप्रमाणे (Code of Conduct) आणखी काही कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. निवडणुकीच्या या टप्प्यात मुंबईसह प्रशासनाने सलग तीन दिवस ड्राय-डे ची घोषणा केली आहे. या काळात मुंबईसह इतर परिसरातील सर्व दारुची दुकाने, आस्थापना बंद असणार आहेत. त्यामुळे काही दिवस मद्यप्रेमींच्या घशाला कोरड पडणार आहे.
महाराष्ट्रात तीन दिवस ‘ड्राय डे’
सोमवार २० मे रोजी मुंबईसह राज्यातील विविध शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार ते पुढील आठवड्यात सोमवारपर्यंत दारूची दुकाने आणि बार बंद राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई, पालघर, कल्याण आणि ठाणे या महाराष्ट्रातील प्रमुख मतदार संघांमध्ये २० मे रोजी मतदान होणार असल्यामुळे या मतदारसंघांमध्ये देखील ‘ड्राय डे’ पाळला जाणार आहे.
भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) निर्देशानुसार, ज्या मतदारसंघात निवडणूक होणार आहे आणि नजीकच्या मतदारसंघांनी ‘ड्राय डे’ पाळणे आवश्यक आहे.
या दिवशी दारूची दुकाने बंद राहणार
मुंबई शहरात १८ मे रोजी संध्याकाळी ५ वाजल्यापासून दारूची दुकाने आणि बार बंद असणार आहेत. त्यानंतर, १९ मे रोजी दिवसभर बंद राहतील आणि २० मे रोजी सायंकाळी ५ नंतर उघडतील. तसेच ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या वेळी मुंबईत पुन्हा ‘ड्राय डे’ जाहीर करण्यात आला आहे.