Monday, March 17, 2025
Homeक्राईमCrime : इंस्टाग्राम रिल्समुळे दोन बहिणी गजाआड! तब्बल ५५ लाखांच्या चोरीची तक्रार

Crime : इंस्टाग्राम रिल्समुळे दोन बहिणी गजाआड! तब्बल ५५ लाखांच्या चोरीची तक्रार

जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

मुंबई : इंस्टाग्रामवर रिल्स बनवणे आणि ते सोशल मीडियावर शेअर करणे हा एक ट्रेंड बनला आहे. पण हा ट्रेंड मुंबई पोलिसांच्या मदतीस आला आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील एका दाम्पत्याने त्याच्या घरात तब्बल ५५ लाखांची चोर झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्याच्याच घरात काम करणाऱ्या दोन मुलींनी चोरी केली असल्याचा संशय दाम्पत्याने सांगितला. संशयानुसार पोलिसांनी दोन्ही मुलींवर कडक नजर ठेवून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी एका वृद्ध दाम्पत्याच्या घरी चोरी झाली होती. त्याची एफआयआर त्याच दिवशी पोलिसात दाखल करण्यात आली. मात्र आरोपींबाबत कोणताही सुगावा पोलिसांना लागला नाही. पोलिसांना या वृद्ध माणसाकडून कळले की, त्यांच्याकडे काम करणाऱ्या मुलींना रिल्स बनवून इंस्टाग्रामवर अपलोड करण्याची आवड होती. दरम्यान, पोलिसांनी इंस्टाग्रामवर तरुणीचा शोध सुरू केला.

छाया वेतकोली (२४) आणि भारती वेतकोली (२१) असे या दोन्ही मुलींचे नाव असून त्यांनी चोरीचे दागिने आणि कपडे घालून रील्स बनवले आणि ते इन्स्टाग्रामवर अपलोड केले होते. पोलिसांनी इनवेस्टिगेशन करताना या मुलींचे इंस्टाग्राम अकाऊंटवरुन लोकेशन ट्रेस केलं. त्यावर या मुलींचं लोकेशन थेट महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात सापडलं. तातडीने पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलींना ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आले.

दरम्यान, या दोन्ही मुली सख्ख्या बहिणी असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या दोन्ही बहिणींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८१ (कारकून किंवा नोकराकडून चोरी) आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -