Friday, May 9, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

मुंबई : घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भावेश भिंडेला राजस्थानच्या उदयपूरमधून ताब्यात घेतले. घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता.


मुंबई पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मुंबईमध्ये अचानक पाऊसाला सुरुवात झाली होती. यावेळी आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर पूर्वमधील एक महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले. होर्डिंग इतके महाकाय होते की त्याने सर्व पेट्रोल पंपच व्यापला. पेट्रोल पंपाखाली असलेल्या गाड्या, माणसं त्याखाली अडकले. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. या अपघातात आतापर्यंत १६ लोकांचा मृत्यू झाला आहे.


५१ वर्षीय भावेश भिंडे याच्यावर होर्डिंग संदर्भात एकूण २६ गुन्हे दाखल आहेत. याशिवाय त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा देखील दाखल आहे. जेव्हा दुर्घटना घडली तेव्हापासून भिंडे नॉट रिचेबल होता. त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे ट्रेस झाले होते. मुंबई पोलीस त्याठिकाणी पोहोचले होते. पण, त्यानंतर तो ऑफलाईन गेला होता. तेव्हापासून पोलीस भिंडेच्या मागावर होते.

Comments
Add Comment