कसे असते नार्सिसिजम व्यक्तिमत्त्व?

Share

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आज आपण नार्सिसिजम (narcissism) व्यक्तिमत्त्व काय असते, अशा व्यक्ती कशा पद्धतीने वागतात, त्यांचा स्वभाव कसा असतो, याबद्दल जाणून घेणार आहोत. नार्सिसिजम हा खरं तर आपल्या व्यक्तिमत्त्वामधील खूप मोठा अवगुण आहे. या व्यक्ती सेल्फसेंटर्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची कायम एकच धारणा असते की, सगळ्यांपेक्षा मी सरस आहे, ग्रेट आहे, मोठा आहे, खरा आहे, सगळे उत्तम गुण फक्त माझ्यात आहेत. अगदी बुद्धिमत्ता, पैसा, वलय, सामाजिक पत, प्रतिष्ठा, हुशारी, सौंदर्य सर्व काही फक्त मीच आहे. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे हे नाही, यातील काहीच नाही; पण त्यांना ते आहे, असं जगाला दाखवायचे आहे, असे लोकं नार्सिसिजम पर्सनॅलिटीचे शिकार होतात.

अनेकदा अशी व्यक्तिमत्त्व अबनॉर्मल असतात. त्यांनी स्वतःची खोटी प्रतिमा (Self Image) पहिली स्वतःच्या मनात तयार केलेली असते आणि मग स्वतःची हीच खोटी प्रतिमा समाजात पसरवण्यासाठी, दाखवण्यासाठी हे लोक सतत प्रयत्न करताना दिसतात. त्यांच्या घरातील, समाजातील, कुटुंबातील, आजूबाजूला जे लोक नार्सिंसिजम लोकांची खोटी प्रतिमा स्वीकारत नाहीत अथवा त्यांना त्याबद्दल प्रश्न विचारतात, आक्षेप घेतात किंवा विरोध दर्शवतात तेव्हा त्या लोकांना नार्सिसिजमच्या आहारी गेलेले हे व्यक्तिमत्त्व स्वतःचे विरोधक, दुश्मन, शत्रू म्हणून घोषित करतात. त्याच पद्धतीने त्यांची बदनामी करतात अथवा त्यांना स्वतःच्या आयुष्यातून लांब करतात. त्यांच्याबद्दल अपप्रचार करून, त्यांच्या वागण्यातील दोष दाखवून, त्यांच्या बद्दलची फक्त चुकीची माहिती पसरवून हे लोक स्वतःची प्रतिमा उंच करण्यात अनेकदा यशस्वी होतात.

नार्सिसिजम व्यक्तिमत्त्वास फक्त त्यांच्या खोट्या प्रतिमेला स्वीकारलेले, त्यांचा उदो उदो करणारे अथवा त्यांचा खोटा मोठेपणा, दिखावा, बढाई यात साथ देणारे, त्यांना कायम चढवत राहणारे, त्यांचा शब्द झेलणारे, पुढे पुढे करणारे लोक जवळ लागतात आणि त्यांनाच ते स्वतःच्या आयुष्यात स्थान देतात. अशी लोकं आजूबाजूला ठेवून नार्सिसिजम व्यक्तिमत्त्व स्वतःचा इगो सुखावून घेत असतात. जे लोक मग ते घरातले, समाजातले, कार्यालयातले, नात्यातले कोणीही असो जर नार्सिसिजमच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला कोणत्याही बाबतीत विरोध करत असतील, त्याच्या चुकीच्या वागणुकीवर योग्य मार्गदर्शन करत असतील, योग्य सल्ला देऊन मार्गावर आणायचा प्रयत्न करत असतील, त्याला स्वतःला बदलायला सांगत असतील, तरी त्यांना अपमानित करून झिडकारून लावले जाते.

हे लोक स्वतःला सगळ्यांपेक्षा वरचढ समजतात. सगळ्यांपेक्षा आपण, आपले विचार आपली हुशारी कशी सरस आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी कसं आपल्या खोट्या प्रतिमेला मोठं करून लोकांवर छाप पाडू, लोकांना आपल्यालाच श्रेष्ठ समजायला भाग पाडू या मानसिकतेमधून वागत असतात. आपलाच अभ्यास, आपलं निरीक्षण, आपला निर्णय, आपलीच विचारधारा सातत्याने कशी बरोबर होती आणि आहे हे पटवून देण्यासाठी हे लोक झपाटून प्रयत्न करतात. अशा लोकांच्या आजूबाजूला किंवा अत्यंत जवळ तेच लोक असतात, ज्यांना स्वतःची वैचारिक कुवत नसते, स्वतःची निर्णय घेण्याइतपत समज नसते. ज्या लोकांना हे व्यक्तिमत्त्व ओळखू येत नाही किंवा ज्यांना सगळं माहिती आहे; व्यक्तिमत्त्व पण स्वतःचा खूप मोठा स्वार्थ साधून घ्यायचा आहे.

नार्सिसिजमच्या आहारी गेलेली व्यक्ती या सर्व जवळच्या लोकांच्या मनात स्वतःची खोटी प्रतिमा तयार करण्यात पूर्ण यशस्वी झालेली असते. ही व्यक्ती जे काही सांगेल, दाखवेल, बोलेल त्यावर डोळे झाकून बाकीचे विश्वास ठेवतात. पण त्यांना हे माहिती नसते की, हे त्यांच्यासाठी सुद्धा किती घातक आहे. नार्सिसिजमच्या आहारी गेलेलं व्यक्तिमत्त्व खोटा मोठेपणा मिरवण्याच्या नादात स्वतःला तर फसवत असतेच, सोबतच त्याच्यावर जे विश्वास ठेवतात, त्यांना पण वेड्यात काढत असते.
नार्सिसिजमच्या आहारी गेलेल्या व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार, मनानुसार, मतानुसार सर्व काही झालंच पाहिजे, यासाठी खूप आग्रही असते. आपल्याबद्दल शंभर टक्के गोष्टी या व्यक्ती कधीच कोणालाच कळू देत नाहीत. आपलं कटू सत्य झाकण्यासाठी, आपण केलेले गुन्हे लपवण्यासाठी, आपल्या चुकांना दाबण्यासाठी आपण चांगले आहोत, बरोबर आहोत, दरवेळी दुसरा कसा चुकला आहे, दुसरा कसा वाईट आहे, हेच सांगत राहतात. असं सातत्याने केल्यावर ज्यांना स्वतःची वैचारिक कुवत नाही, त्यांना हेच खरं आहे असं वाटतं आणि ते पण त्या आभासी खोट्या प्रतिमेचा, खोट्या दिखाऊ परिस्थितीचा एक भाग बनून जातात.

आपली खोटी इमेज जी वास्तवात नाहीये, तीच खरी आहे, हे दाखवण्यासाठी हे लोक स्वतःच्या सोयीने, स्वतःच्या इच्छेने स्वतःची अथवा आपल्या परिस्थिती अथवा कोणत्याही विषयाची तात्पुरती किंवा तेवढ्यापुरतीच माहिती इतरांना समजू देतात. त्यांच्यासाठी जी माहिती लोकांना समजणे योग्य आहे, तीच ते सांगतात, तर त्यांच्याबद्दलचा इतर तपशील जो खरा आहे, महत्त्वाचा आहे, तो ते सफाईदारपणे लपवतात अथवा त्यावर विचारणा केली असल्यास, ते सांगणे टाळतात. अशी व्यक्तिमत्त्व खूप टोक्सिक (Toxic ) असतात. हे लोक इतरांना खूप पटकन गॅस लाईट करून, स्वतःचं म्हणणं गळी उतरवू शकतात. अशा लोकांचं जे समर्थन करतात, बाजू घेतात अथवा त्यांना सर्व चुकीच्या कामात साथ देतात, ते स्वतः खऱ्या माहितीपासून वंचित असतात आणि कायम ठेवले जातात. वेळोवेळी त्यांना काही ना काही अर्धवट, तात्पुरती माहिती देऊन, टाळून, विषयांतर करून गप्प केलेले असते.

नार्सिसिजम व्यक्तिमत्त्व असलेल्या लोकांच्या हातात जर कुटुंबातील, समाजातील, घरातील कोणत्याही स्वरुपाची सत्ता असेल, तर ते त्याचा खूप गैरवापर करताना दिसतात. आर्थिक सत्ता त्यांच्या हातात असल्यास, ते अजिबात त्याबद्दल पारदर्शक नसतात. निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना असल्यास, ते कधीच इतरांच्या सोयीचे अथवा इतरांना अपेक्षित निर्णय घेत नाहीत, तर त्यांना हवे तसेच निर्णय घेतात. असे लोक ॲथोरिटीमध्ये असल्यास इतर कोणालाही महत्त्वाचे स्थान अथवा महत्त्व देत नाहीत. छोट्यातला छोटा निर्णय, कामं त्यांना विचारूनच होणे त्यांना अपेक्षित असते. हे लोक कोणी कितीही समजावलं, तरी ऐकून त्यानुसार करत नाही. आपण एखाद्याचं ऐकलं, त्याला मोठेपणा दिला, त्याचा सल्ला घेतला हे अशा लोकांना अजिबात मान्य नसतं. अशा वृत्तीमुळे हे लोक अनेकदा चुकतात, फसतात, खड्ड्यात जातात, स्वतःच नुकसान करून घेतात; पण बदलत नाहीत.

नार्सिसिजम व्यक्तीचे चांगले गुण पण त्यामुळे अनेकदा त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतात. त्यांच्या जवळ राहून फक्त तोंडावर त्यांची खोटी स्तुती करणारे, प्रेम दाखवणारे जे लोक त्यांनी जवळ केलेले असतात, ते अशा लोकांचा भरपूर फायदा करून घेतात, स्वार्थ साधून घेतात आणि स्वतःचं भलं करून घेतात. या लोकांनी खरं सांगणारी, योग्य मार्ग दाखवणारी लोक लांब केलेली असल्यामुळे नाटकी आणि खोट्या लोकांना मात्र खूप फायदा होतो आणि नार्सिंसिजमच्या आहारी गेलेली व्यक्ती चुका करत राहते, दिशाहीन होत राहते, त्याचं आयुष्य भरकटत राहते. आपण स्वतः तर अशा स्वभावाचे नाही ना? किंवा आपल्या आजूबाजूला, जवळ कोणी असं व्यक्तिमत्व नाही ना, ज्याचा आपल्याला त्रास होतोय आणि आपण निमूटपणे ते सहन करतोय? याची जाणीव आपल्याला होणं आणि त्यावर आपल्यामार्फत उपाययोजना करणं खूप महत्त्वाचे आहे.
meenonline@gmail.com

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

9 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

28 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

29 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago