PBKS vs RR: राजस्थान आणि पंजाब किंग्सच्या सामन्यात संजु सॅमसनने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर जॉस बटलरच्या जागी संधी मिळालेल्या टॉम कोहलर-कॅडमोर याने १८ धावा केल्या. तर यशस्वी जयस्वाल ४ धावा बनवुन बाद झाला. कर्णधार संजू सॅमसन देखील काही खास करु शकला नाही. त्याने १५ बॉलमध्ये ३ चौकारांसह १८ धावा जोडल्या.
त्यानंतर आलेल्या रियान परागचं अर्धशतक अवघ्या २ धावांनी हुकलं. रियान पराग याने ३३ बॉलमध्ये ६ चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या. रियानच्या धावांमुळे राजस्थान सन्मानजनक आव्हान देऊ शकला. आर अश्विनने १ सिक्स आणि ३ चौकारांच्या मदतीने २८ धावांचं योगदान दिलं. पंजाबकडून राहुल चहर, हर्षल पटेल आणि कॅप्टन सॅम करन या तिघांनी सर्वाधिक १-१ गडी बाद केले. तर अर्शदीप सिंह आणि नॅथन एलिस यांच्या खात्यात १-१ गडी बाद केले. राजस्थानन २० षटकांमध्ये ९ गडी गमावून १४४ धावा करु शकले.
राजस्थानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचे सलामीवीर विशेष खेळी करु शकले नाहीत. प्रभसिमरन ६ धावा तर जॉनी बेअरस्टो १४ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला रोसोदेखील २२ धावांवर परतला. पण अडचणीच्या वेळी सॅम करनने कर्णधार पदाला साजेशी खेळी करत संघाला सावरलं. जितेश शर्माने २२ धावांच योगदान दिले.राजस्थानकडुन युजवेंद्र चहल आणि आवेश खानने २-२ गडी बाद केले. तर ट्रेन्ड बोल्टने १ गडी बाद केला. पण करनने ४१ चेंडुत ६३ धावा बनवुन विजश्री खेचुन आणला. पंजाबने ५ गडी राखुन राजस्थानचा पराभव केला.