Monday, July 22, 2024
Homeनिवडणूक २०२४Nashik LokSabha 2024 : नाशिकमध्ये आज दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शन!

Nashik LokSabha 2024 : नाशिकमध्ये आज दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शन!

५ व्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धडाका

नाशिक : निवडणुकीच्या रणधुमाळीत (Loksabha Election 2024) दिग्गज नेत्यांची चांगलीच रणनीती पाहावयास मिळत आहे. राज्यात पहिल्या चार टप्प्यातील मतदान यशस्वीरीत्या पार पडले आहे. तर आता पुढील टप्प्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये दिग्गज नेत्यांचे शक्तिप्रदर्शन होणार आहे. (Nashik LS Election 2024)

२० मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान (Voting) पार पडणार आहे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहे. नाशिकमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) जाहीर सभा होणार आहेत. त्यामुळे नाशिकसाठी आजचा दिवस पॉलिटिकल ब्लॉकबस्टर ठरणार आहे.

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघांसाठी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः मैदानात उतरले आहेत. त्यामुळे नाशिक आणि दिंडोरी लोकसभेसाठी आज नरेंद्र मोदी यांची पिंपळगावमध्ये सभा होणार आहे. दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांच्यासाठी शरद पवारांची (Sharad Pawar) वणीमध्ये सभा पार पडणार आहे. तर महाविकास आघाडीचे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची (Uddhav Thackeray) नाशिक शहरात जाहीर सभा होणार आहे.

तिन्ही नेत्यांच्या सभांमुळे प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापलेलं दिसत आहे. नाशिक आणि दिंडोरीमध्ये होणाऱ्या सभांची पूर्ण तयारी करण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी सुरक्षिततेच्या हेतुने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नाशिकमध्ये आज भाजपा आणि महाविकास आघाडी आमनेसामने असणार आहे. त्यामुळे कुणाच्या सभेला किती गर्दी होते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -