Sangali Loksabha : विश्वासात न घेता सांगलीच्या जागेबाबत घाई!

विश्वजित कदम यांचा सांगलीच्या राजकारणावरुन काँग्रेसवर आरोप


मुंबई : 'सांगलीच्या जागेबाबत घाई करण्यात आली. आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते. आम्ही सांगलीचे वाघ आहोत, हे एका रात्रीत हे विधान आले नाही. सांगली जिल्ह्यात आम्ही वर्षानुवर्षे काम करत आहोत. जनतेच्या सुखदुखात सहभागी होत आहोत. सांगली जिल्ह्यातील भावना मांडणे माझे काम होते. नाना पटोले, बाळासाहेब थोरात हे सांगलीच्या जागेसाठी लढले. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी एका विशिष्ट उद्देशाने एकत्र आले आहेत. या परिस्थितीत काँग्रेसने मनाचा मोठेपणा दाखवला', असे सांगत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीच्या राजकारणावर भाष्य केले.


आमदार विश्वजित कदम म्हणाले की, गेल्या २ वर्षापासून राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु झाली, त्यात ती यात्रा महाराष्ट्रात आली, तेव्हा ३२५ किमी त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून महाराष्ट्रात २ नेते चालले. मी नांदेड ते बुलढाणा पायी चाललो. त्यामुळे मी भाजपासोबत जाण्याचा प्रश्न येतोच कुठे? कर्नाटकातील निवडणूक असेल, तिथे काँग्रेसचे सिद्धरामैय्या विजयी झाले. ते सांगलीत आले, तेव्हा त्यांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम सांगली शहरात आयोजित केला होता. एक काळ मी महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाहिला आहे. महाराष्ट्रात वैचारिक राजकारण होत होते, परंतु व्यक्तिगत लढाई नव्हती. परंतु आज विरोधी पक्षातील आमदाराशी जाहीरपणे बोलले तरी हा भाजपात चाललाय, हा शिवसेनेत चाललाय, हा राष्ट्रवादीत चाललाय अशी चर्चा होते. याचा अर्थ राजकारणात व्यक्तिगत संबंध असूच नये का? असं सांगत त्यांनी भाजपा प्रवेशावर स्पष्टीकरण दिले.


तसेच मविआतील तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसले होते. शाहू महाराजांना कुठल्या पक्षात लढायचे, हे त्यांनी ठरवले. त्याठिकाणी शाहू महाराजांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढण्याचे ठरवले. त्यामुळे कोल्हापूरचा आणि सांगलीचा संबंध नव्हता. हातकणंगले जर ठाकरेंना मिळाली तर सांगली कशासाठी? हे आमचे म्हणणे होते. ३ मे रोजी कोल्हापुरात उद्धव ठाकरे आले, तेव्हा निवडणुकीची वस्तुस्थिती, सांगलीची परिस्थिती यावर व्यक्तिगत चर्चा केली. २ महिन्याचा कालावधी हा उत्सुकतेचा, संघर्षाचा आणि काही प्रमाणात निराशेचा होता. एखाद्या नेतृत्वाला जी गोष्ट हवी असते, ती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यानंतर अचानक एखादा निर्णय होतो, त्यानंतर काय भावना असते, या सर्व गोष्टीतून मी २ महिन्यात गेलो आहे असेही विश्वजित कदमांनी सांगितले.


दरम्यान, काँग्रेसचे संघटन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात कार्यकर्ते सापडतील. उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला, शरद पवारांच्या बाबतीत या वयात जे घडले त्याबाबत महाराष्ट्रातील जनतेच्या मनात तीव्र संताप आहे. महाराष्ट्राची जनता विचार करून मतदान करते, असे विश्वजित कदमांनी म्हटले.



खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवे येणार नाही


विशाल पाटील आणि माझी जोडी तुटलीय हे कुणी सांगितले? सांगलीच्या जागेबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीपर्यंत इच्छा होती, मी लोकसभेची निवडणूक लढवावी. परंतु माझ्या मतदारसंघातील लोकांना मला सोडायचं नव्हते अशी माझी भावना होती. उद्धव ठाकरेंबाबत व्यक्तिश: प्रचंड आदर आहे. बाळासाहेबांचा वारसा ते चालवतायेत, संघर्षातून त्यांना वाटचाल करावी लागतेय. परंतु सांगलीच्या बाबतीत निर्णय घेण्यास घाई झाली. मी विशालला शब्द दिला होता. खासदारकीमध्ये आम्ही कुणी आडवे येणार नाही, जरी पक्षश्रेष्ठींनी सांगितले तरी मी माझ्या पातळीवर ते अडवण्याचा प्रयत्न करेन, असा खुलासाही विश्वजित कदम यांनी केला.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी