Saturday, July 20, 2024
Homeक्राईमAlamgir Alam : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक!

Alamgir Alam : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना अटक!

सचिवाच्या नोकराकडे ३७ कोटींची रोकड सापडल्याप्रकरणी ईडीची कारवाई

रांची : निवडणुकीच्या काळात सुरु असलेला पैशांचा पाऊस सर्वसमान्यांना थक्क करणारा आहे. ईडीने टाकलेल्या छाप्यांमध्ये कोटींच्या घरात रोकड आढळून येत असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. झारखंड येथे तर काँग्रेसच्या नेत्याने हद्द पार केली. झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम (Alamgir Alam) यांचे स्वीय सचिव संजीव लाल (Sanjiv Lal) यांच्या नोकराच्या घरातून ईडीने ६ मे रोजी ३७ कोटी इतकी मोठी रोकड जप्त करण्यात आली. या प्रकरणात आलमगीर आलम यांना ईडीने चौकशीनंतर अटक केली आहे.

आलमगीर आलम यांच्या सचिवाच्या नोकराकडे ३७ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली होती. या प्रकरणी आज सकाळी ११ वाजल्यापासून त्यांची चौकशी सुरु होती. त्यानंतर ईडीने त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. गुरुवारी ईडीने त्यांना समन्स पाठवलं होतं. आलम यांना १४ मे रोजी रांचीतल्या झोनल कार्यालयात हजर होण्यास सांगण्यात आलं होतं. ते काल ईडीसमोर हजर झाले होते. तेव्हा त्यांची तब्बल १० तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर आज पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं.

१० हजार रुपयांच्या लाचेचं प्रकरण

ईडीने मागच्याच वर्षी मे महिन्यात चिफ इंजिनिअरकडे १० हजारांच्या लाचेच्या प्रकरणात रेड टाकली होती. त्यावेळी त्यांचा जबाब नोंदवला गेला. ते म्हणाले की, मंत्र्यांकडे लाचेचा पैसा पोहोच केला जातो. त्यानंतर झारखंडचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा पुढे आलं होतं. तपासणीमध्ये आलमगीर यांचे खासगी सचिव संजीव लाल यांचंही नाव पुढे आलं. आता तर संजीव लाल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकराकडे ३७ कोटी रक्कम सापडली आहे.

कोण आहे आलमगीर आलम?

आलम हे पाकूर विधानसभेचे चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्रामविकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते ४ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -