Saturday, July 6, 2024
Homeमहत्वाची बातमीWeather updaes : मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता! राज्यात इतर ठिकाणी कशी...

Weather updaes : मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता! राज्यात इतर ठिकाणी कशी असणार परिस्थिती?

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

मुंबई : मुंबईसोबतच नवी मुंबई, बदलापूर, कल्याण, पालघर, नाशिक परिसरात काल पडलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हाहाकार माजवला. यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक जणांना जीवही गमवावा लागला. घाटकोपरमध्ये महाकाय होर्डिग (Ghatkopar hoarding news) कोसळले तर वडाळा येथे पार्किंग लॉट कोसळल्याने प्रचंड नुकसान व जीवितहानी झाली. यानंतर आज मुंबई व राज्यात इतर ठिकाणी कशी परिस्थिती असेल, याविषयी हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने (Mumbai Center of Meteorological Department) अंदाज वर्तवला आहे. मुंबईत आजही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट (Yellow alert) जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजही मुंबईत वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईसह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. या सर्व भागात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नारिकांनी योग्य ती खबदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावासाचा अंदाज

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वाऱ्यासह (४०-५० किमी प्रतितास वेग), हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -