Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : केरळने काँग्रेसला धडा शिकवला; यूपीमध्ये त्यांचं खातंही उघडणार...

PM Narendra Modi : केरळने काँग्रेसला धडा शिकवला; यूपीमध्ये त्यांचं खातंही उघडणार नाही!

दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य

नरेंद्र मोदी यांचा राहुल गांधींवर घणाघात

लखनऊ : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सर्व राजकीय पक्षांची पाचव्या टप्प्यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. बड्या बड्या नेत्यांनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर सभेमध्ये अनेक पक्ष आपल्या विरोधकांवर हल्लाबोल करत आहेत. अशातच राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्यामुळे पंतप्रधानांनी राहुल गांधींना चांगलाच टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेने आणि केरळने काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला आहे. त्यामुळे यूपीमध्ये काँग्रेसचं खातंही उघडणार नाही अशी बोचरी टीका पंतप्रधानांनी केली.

एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी यांनी ‘उत्तर प्रदेश नक्कीच आम्हाला भरपूर आशीर्वाद देईल आणि कोणतीही कमी राहू देणार नाही’, असे म्हटले आहे. तर राहुल गांधी यांच्या रायबरेलीतून निवडणुकीबाबत, ”केरळने काँग्रेसला चांगलाच धडा शिकवला आहे, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही त्यांना चांगल ओळखलं आहे. वायनाडमधून पळून गेल्यानंतर आणि रायबरेलीला येण्याचा निर्णय घेण्यापूर्वी राहुल गांधी यांची भाषा आणि स्वर अतिशय धारदार केले आहेत आणि ते काहीही बोलत आहेत”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

दिल्लीतील भाजपाचे सरकार हे उत्तर प्रदेशचं भाग्य

“उत्तर प्रदेशातील लोक अतिशय उदार स्वभावाचे लोक आहेत. ती जनता आता घराणेशाही स्वीकारू शकत नाही. योगीजींच्या नेतृत्वाखाली अनेक गोष्टी घडल्या, बदल झाला आणि त्याचा परिणाम झाला. लोकांना माहीत आहे की येथे भाजपाचे सरकार असणे, दिल्लीत भाजपाचे सरकार असणे हे उत्तर प्रदेशचं भाग्य आहे. माझं भाग्य आहे की, मला प्रत्येक राज्यात अशी टीम मिळाली आहे, मग ते सत्तेत असो किंवा विरोधात, मुख्यमंत्री असो वा मंत्री, ते तत्वांसाठी असतात. आमचं सौभाग्य आहे की आमच्याकडे अशी शेकडो आश्वासक माणसं आहेत” असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -