Saturday, July 6, 2024
Homeताज्या घडामोडीPistachios:दररोज करा पिस्त्याचे सेवन, असे करा डाएटमध्ये समावेश

Pistachios:दररोज करा पिस्त्याचे सेवन, असे करा डाएटमध्ये समावेश

मुंबई: पिस्तामध्ये सगळे गरजेचे व्हिटामिन्स आणि मिनरल्स आढळतात. खासकरून व्हिटामिन बी६, थायमिन, फॉस्फरस आणि मँगनीज मोठ्या प्रमाणात आढळते. जाणून घ्या दररोजच्या डाएमध्ये सामील करण्याचे फायदे

पिस्ता तुम्ही हिरव्या भाज्या, फळे आणि पनीर सारख्या सॅलड पदार्थांसोबत खाऊ शकता. तुमच्या आवडत्या सलाडमध्ये स्वाद आणि कुरकुरीतपणा वाढवण्यासाठी तुम्ही कापलेले पिस्ता टाकू शकता. यामुळे सलाडची चव वाढेल.

तुमच्या पदार्थाचा स्वाद आणि पोषणमूल्य वाढवण्यासाठी पिस्ता बदाम, काजू आणि अक्रोडसारख्या इतर सुकामेव्यांसोबत कॅनबेरी, मनुका यांच्यासोबत मिसळून खाऊ शकता.

सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही पिस्ता स्मूदीचा समावेश करू शकता. यामुळे व्यवस्थित मिक्स होते. सोबतच यात गरजेच असलेले अँटी ऑक्सिडंट, व्हिटामिन आणि खनिजांनी भरपूर असतात जे आरोग्यासाठी गरजेचे आहे.

पिस्ता बटर – तुम्ही भाजलेले पिस्ता बारीक होईपर्यंत वाटून स्वादिष्ट पिस्ता बटर बनवू शकता. ते अधिक स्वादिष्ट आणि पौष्टिक होण्यासाठी टोस्ट, सँडविच अथवा फळांसोबत मिसळून खा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -