Friday, July 5, 2024
Homeताज्या घडामोडीJackie Shroff : 'भिडू' शब्दावरुन जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव!

Jackie Shroff : ‘भिडू’ शब्दावरुन जॅकी श्रॉफची दिल्ली हायकोर्टात धाव!

नेमकं प्रकरण काय?

नवी दिल्ली : अभिनेते किंवा अभिनेत्री आपल्या एखाद्या डायलॉगने किंवा स्टाईलने प्रसिद्ध होत असतात. त्यांचा एखादा डायलॉग प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतो आणि कालांतराने तीच त्यांची ओळख बनून जाते. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफचीही (Jackie Shroff) स्टाईल खूप फेमस आहे. जॅकी श्रॉफ हा आपल्या बोलण्यात भिडू या शब्दाचा वापर करतो. त्याची बोलण्याचीही एक वेगळी स्टाईल आहे. त्यामुळेच जॅकी श्रॉफ हा बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपेक्षा (Bollywood actors) वेगळा ठरतो. मात्र, या स्टाईल आणि भिडू शब्दामुळे जॅकीने दिल्ली हायकोर्टात (Delhi Highcourt) धाव घेतली आहे. जाणून घेऊयात नेमकं प्रकरण काय…

जॅकी श्रॉफने दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत आपल्या खासगी आणि सार्वजनिक अधिकारांच्या संरक्षणाची मागणी केली आहे. त्याशिवाय, पूर्वसंमतीशिवाय आपले नाव, फोटो, आवाज आणि ‘भिडू’ शब्द वापरणाऱ्यांविरोधात खटला दाखल केला आहे. सोशल मीडिया आणि एआय ॲप्सशिवाय इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्याचा आवाज, फोटो किंवा त्याच्याशी संबंधित कोणत्याही बाबी वापरण्यापूर्वी त्याच्याकडून परवानगी घ्यावी, असे निर्देश हायकोर्टाने द्यावेत अशी मागणी जॅकीने केली आहे.

जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेवर आता १५ मे रोजी सुनावणी होणार आहे. जॅकी श्रॉफने दाखल केलेल्या याचिकेनुसार, पॅरोडी, विडंबनात्मक कलाकृतीसाठी आपला आवाज, व्यक्तीमत्त्वाचा वापर करण्यास मनाई नाही. मात्र, चुकीच्या गोष्टींसाठी, बदनामीकारक कंटेंट तयार करण्यासाठी आपल्या आवाजाचा, व्यक्तिमत्त्वाचा वापर होता कामा नये असे जॅकी श्रॉफने म्हटले आहे.

अमिताभ बच्चन यांनीही याचिका दाखल केली आहे

दरम्यान, अशी याचिका दाखल करणारा जॅकी श्रॉफ हा पहिला अभिनेता नाही, याआधी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही आपल्या अधिकारांच्या संरक्षणाची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. त्यांनी २०२२ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचा फोटो, नाव, आवाज आणि व्यक्तिमत्त्वाशी निगडीत गोष्टी वापरण्यास मनाई करावी अशी मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अंतरिम आदेश जारी केला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -