Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीGhatkopar hording news : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

Ghatkopar hording news : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत तर जखमींचा खर्च सरकार उचलणार

दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई: मुंबईत काल दुपारी कडकडीत ऊन पडलेले असताना अचानक सोसाट्याचा वारा वाहू लागला आणि जोरदार पाऊस पडला. अगदी काही मिनिटांसाठी पडलेल्या या पावसाने जनजीवन विस्कळीत केले. तर काहींचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. घाटकोपर वादळी वाऱ्यामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळलं. या अपघातातील मृतांची संख्य वाढली असून हा आकडा १४ वर गेला आहे. तर ७५ जण जखमी झाले आहेत. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली असून मृतांच्या नातेवाईकांना व जखमींना सरकारी मदत जाहीर करण्यात आली आहे.

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांनी या पेट्रोल पंपावर आसरा घेतला होता. मात्र त्याचवेळी पंपालगत उभारलेला एक अवाढव्य होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे थेट पेट्रोल पंपावर कोसळला. या होर्डिंगखाली तब्बल ८० वाहने अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर वेगाने बचावकार्य सुरू झालं. मात्र, यात आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण होर्डिंग हटवल्यानंतर ढिगाऱ्याखाली आणखी काही माणसं अडकली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राजवाडी रुग्णालयात १३ जणांचा मृत्यू आणि एका व्यक्तीचा मृत्यू सायन रुग्णालयात झाल्याची माहिती घाटकोपर पोलिसांनी दिली आहे. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारने जाहीर केली, तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.

पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी पंतनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोल पंप मालक भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीसी कलम ३०४, ३३८, ३३७, ३४ अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक तपास पंतनगर पोलीस करत आहे. मुंबई महानगरपालिका डिझास्टर अॅक्ट अंतर्गत संबंधित कंपनी आणि रेल्वे प्राधिकरणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. राज्य सरकारच्या जागेत हा अनधिकृत बॅनर लावल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच्या आजूबाजूला तीन अजून मोठे अनाधिकृत होल्डिंग बॅनर आहे त्याच्यावर देखील पालिका कारवाई करत आहे.

दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहणी केली. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतल्या सर्वच होर्डिंग्जचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसंच अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवण्याचे आदेश दिलेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही घटनेची पाहणी करुन अपघाताची माहिती जाणून घेतली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -