भाजपा कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन
पुणे : देशभरात १० राज्यांत व ९६ मतदारसंघांत आज लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पुणे लोकसभेचाही समावेश आहे. मात्र, पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौक परिसरातील मतदान केंद्राजवळ अनुचित प्रकार घडला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर्स दिसल्यामुळे भाजपा आक्रमक झाली आहे.
फडके हौद चौकात काँग्रेसकडून लावण्यात आलेले बॅनर अनधिकृत असून पोलीस त्यावर कारवाई करत नसल्याचा आरोप करत भाजपने याठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. पुण्यातील फडके हौद चौकात भाजपचे कार्यकर्ते हेमंत रासनेंच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करत आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते याठिकाणी हजर आहेत.