
मुंबई: मुंबईत सोमवारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुंबईत आलेल्या धुळीच्या वादळाने तसेच अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या. जोरदार पाऊस आणि वादळामुळे घाटकोपर परिसरातील पेट्रोल पंपावर होर्डिंग पडले. यात ४ जणांचा मृत्यू झाला तर ५४ जण जखमी झाले. ही दुर्घटना दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी झाली. छेदानगर जिमखान्याजवळ ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला तर ५९ जखमी लोकांना बाहेर काढण्यात आले. दरम्यान, बरेचजण या होर्डिंगखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यात निधीमधून ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच यात जखमी झालेल्या व्यक्तींवर सरकारडून उपचार केले जाणार आहेत.
🏹 Live |📍मुंबई 🔸 13-05-2024
पत्रकारांशी संवाद https://t.co/N2G4Oc4jud
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) May 13, 2024
या दुर्घटनेप्रकरणी उपमुख्यमंत्री म्हणाले, या प्रकरणी उच्च स्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाची टीम बचावकार्यात व्यस्त आहे. जखमी व्यक्तींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.