Saturday, July 5, 2025

Mumbai Rain : मुंबईतील अवकाळी पावसाचं रौद्र रुप; पेट्रोल पंपावर कोसळले होर्डिंग

Mumbai Rain : मुंबईतील अवकाळी पावसाचं रौद्र रुप; पेट्रोल पंपावर कोसळले होर्डिंग

होर्डिंग खाली अनेकजण दबल्याची शक्यता


मुंबई : मुंबईसह परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील या अवकाळी पावसाने रौद्र रुप दाखवले आहे. अनेक ठिकाणी मोठी झाडे, होर्डिंग्स पडल्याच्या धक्कादायक घटना घडत आहेत. त्यातच घाटकोपर हायवे पोलीस क्वार्टर पेट्रोल पंप येथील होर्डिंग पडल्याने झाालेल्या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५९ जखमी झाले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, साडेचार वाजता घाटकोपर पूर्व येथील पंतनगरमध्ये पूर्व हायवेवर पोलीस ग्राऊंड पेट्रोल पंपावर हा अपघात घडला आहे. अनेक वाहने, पेट्रोल पंपावरील कर्मचारी होर्डिंग खाली दबले गेले असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दबलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.


दरम्यान, पाऊस सुरु असल्याने मदतकार्याला वेळ लागत आहे. तसेच अद्यापही जीवितहानीबाबत माहिती मिळू शकली नाही.


Comments
Add Comment