Sunday, March 23, 2025
Homeक्राईमMumbai Police : मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई! १०४ कोटींचा कच्चा माल...

Mumbai Police : मुंबई पोलिसांची राजस्थानमध्ये मोठी कारवाई! १०४ कोटींचा कच्चा माल जप्त

नशा वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यावर टाकला छापा 

जोधपूर : गेल्या काही दिवसांत अवैध पदार्थांच्या तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच मुंबई पोलिसांना राजस्थानमध्ये नशा वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती करणारा कारखाना असल्याची खबर मिळाली आणि पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला. धक्कादायक बाब म्हणजे या छाप्यात तब्बल १०४ कोटींचा कच्चा माल आढळला आहे. मेफेड्रोन (Mephedrone) आणि इतर औषध बनवण्यासाठी वापरली जाणारी रसायने देखील जप्त करण्यात आली आहेत. डिसेंबर २०२३ मुंबई पोलिसांनी केलेल्या एका कारवाईमुळे पोलिसांना या कंपनीविषयी माहिती मिळाली आणि पोलिसांनी या कंपनीचा भांडाफोड केला.

मुंबई पोलिसांनी डिसेंबर २०२३ मध्ये अंमली औषधांच्या तस्करीप्रकरणी तीन जणांना अटक केली होती. पोलिसांना त्यावेळी केलेल्या चौकशीत राजस्थानच्या जोधपूरमध्ये चालवल्या जाणाऱ्या औषध निर्मितीच्या कंपनीची माहिती मिळाली होती. पोलिसांनी या कंपनीचा भांडाफोड करत मालक हुकुमराम चौधरीला अटक केली आहे. सोबतच सर्व कच्चा मालही जप्त केला आहे, ज्याची किंमत १०४ कोटी रुपये आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबई पोलिसांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. याचं कारण म्हणजे साकीनाका पोलीस स्टेशनच्या चंद्रकांत पवार यांना काही लोक मेफेड्रोन विकण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांनी या माहितीवरुन कारवाई करत सरफराज शेख (२२), माजिद उमर शेख (४४), अब्दुल कादर शेख (४४) यांना अटक केली होती. या तीन आरोपींकडून त्यावेळी ३.३३५ कोटी रुपयांचं १.६५५ किलोग्राम मेफेड्रोन जप्त केलं होतं.

डीसीपी मंगेश शिंदे यांनी मुंबईत या तीन आरोपींना अटक केल्यानंतर आरोपींनी मेफेड्रोन कुठून खरेदी केली याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना अधिक चौकशी केली असता राजस्थानच्या जोधपूरमध्ये नशा वाढवणाऱ्या औषधांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती मिळाली होती. मुंबई पोलिसांनी तीन आरोपींच्या कॉल डिटेल्सच्या आधारावर पुण्यातील प्रशांत पाटील या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. प्रशांत पाटीलकडे चौकशी केल्यानंतर जोधपूरच्या कारखान्याची माहिती मिळाली.

प्रशांत पाटील याने मुंबई पोलिसांना सांगितलं की जोधपूरमधील हुकूमराम चौधरी जोधपूरच्या सचिन कदमच्या सांगण्यावरुन औषधाची कंपनी चालवत होता. यानंतर पोलिसांनी तातडीने या कंपनीवर छापा टाकत मेफेड्रोन आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल जप्त केला. ज्याची किंमत १०४ कोटी रुपये आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -