
जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के मतदान?
मुंबई : लोकसभेसाठी चौथ्या टप्प्यात (Loksabha Election 2024) आज सकाळपासून मतदान सुरु झाले आहे. यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या (UT) ९६ जागांवर मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात आंध्र प्रदेशातील २५, बिहारमधील ५, झारखंडमधील ४, मध्य प्रदेशातील ८ आणि महाराष्ट्रातील ११ जागांसाठी मतदान होत आहे. याशिवाय ओडिशातील ४, तेलंगणातील १७, उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ८ आणि जम्मू-काश्मीरमधील एका जागेसाठी मतदान होत आहे.
सकाळी ११ वाजेपर्यंत देशात २४.८७% मतदान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद पश्चिम बंगालमध्ये झाली आहे. या ठिकाणी ३२.७८% मतदान झाले आहे.आंध्र प्रदेश - २३.१०% बिहार - २२.५४% जम्मू-काश्मीर - १४.९४% झारखंड - २७.४०% मध्य प्रदेश - ३२.३८% महाराष्ट्र - १७.५१% ओडिशा - २३.२८% तेलंगणा - २४.३१% उत्तर प्रदेश - २७.१२% पश्चिम बंगाल - ३२.७८%